For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तांबोसे तोरसे येथे महामार्गावर चॅपेलला धोका

12:17 PM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
तांबोसे तोरसे येथे महामार्गावर चॅपेलला धोका
Advertisement

संरक्षणभिंत उभारण्याबाबत महामार्ग कंत्राटदार एम. व्ही. आर कंपनीकडून दुर्लक्ष

Advertisement

पेडणे : तांबोसे मोपा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग 66वर एक जुने ख्रिस्ती वाड्यावर चॅपेल आहे. या चॅपेल राष्ट्रीय महामार्ग 66 चे ऊंदीकरण करत असताना धोका निर्माण झाला आहे. मात्र याबाबत तक्रार करूनही कंत्राटदार एम. व्ही. कंपनीने याकडे दुर्लक्ष केले. सध्या पेडणे तालुक्मयातील पत्रादवी ते महाखाजन धारगळ पर्यंतच्या महामार्गाच्या ऊंदीकरणाचे काम एम. व्ही. आर.  कंपनी करत आहे. या ठिकाणी संरक्षणभिंत आणि अगोदर सर्व्हिस रस्ते करावे. यासाठी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर, सरपंच सुबोध महाले, पंच दयानंद गवंडी, सदस्यांनी आणि अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीचे अभियंता यांच्याशी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी चर्चा करून या चॅपेलच्या बाजूला संरक्षण भिंत बांधावी तसेच अगोदर सर्व्हिस रस्ते केल्यानंतरच राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घ्यावे, अशी सूचना केली होती. परंतु, आजपर्यंत एम. व्ही. आर कंपनीने सर्व्हिस रस्त्याचे काम हाती घेतले नाही. तसेच संरक्षणभिंत देखील उभारली नाही. त्यामुळे रस्त्याच्या बाजूचे कठडे हळूहळू कोसळत आहेत.

दुर्घटना घडण्यापूर्वी उपाययोजना करा : सुबोध महाले

Advertisement

हा प्रकार असाच चालू राहिला भविष्यात या चॅपेलला मोठा धोका आहे. सरकारने या ठिकाणी लवकरात लवकर संरक्षण भिंत उभारून ख्रिस्ती बांधवांना दिलासा द्यावा. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच उपाययोजना करावी. अशी मागणी सरपंच सुबोध महाले यांनी केली आहे.

अर्धवट कामे लवरकर पूर्ण होणार!

दरम्यान, या संदर्भात स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याशी संपर्क साधला असता आमदार प्रवीण आर्लेकर यांनी राष्ट्रीय महामार्ग 66वर जेवढी कामे अर्धवट स्थितीत आहेत. त्या संदर्भात आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चा केली असून कामे दोन दिवसानंतर लगेच सुऊवात करून ती पूर्ण केली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिली.

Advertisement
Tags :

.