महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

1 ते 19 नोव्हेंबरपर्यंत धोका...

06:10 AM Oct 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दहशतवादी पन्नूची एअर इंडियाच्या विमानात स्फोटाची धमकी

Advertisement

वृत्तसंस्था/ टोरंटो

Advertisement

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूने सोमवारी पुन्हा एकदा एअर इंडियाच्या विमानात स्फोट घडविण्याची धमकी दिली आहे. 1-19 नोव्हेंबर या कालावधीत एअर इंडियाच्या विमानाला लक्ष्य केले जाऊ शकते असे पन्नूने म्हटले आहे. पन्नू हा प्रतिबंधित दहशतवादी संघटना शिख फॉर जस्टिसचा संस्थापक आहे. पन्नू हा अमेरिका तसेच कॅनडाचा नागरिक आहे.  त्याने मागील काही वर्षांमध्ये अनेकवेळा एअर इंडियाच्या विमानात स्फोट घडवून आणण्याची धमकी दिली आहे.

भारतात अनेक एअरलाइन्सना संभाव्य बॉम्बस्फोटांविषयी अनेक धमकीयुक्त कॉल प्राप्त झाले असताना पन्नूने ही नवी धमकी दिली आहे. धमकीचे सर्व कॉल हे खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच भारत आणि कॅनडा यांच्यात कूटनीतिक वाद सुरू असताना पन्नूने भारताला धमकी दिली आहे. कॅनडाने भारतावर स्वत:च्या भूमीत दहशतवाद्याची हत्या घडवून आणल्याचा आरोप केला आहे.

नोव्हेंबर 2023 मध्ये पन्नूने एक व्हिडिओ जारी केला होता, यात दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलण्यात येईल आणि 19 नोव्हेंबर रोजी लोकांनी एअर इंडियाच्या विमानातून प्रवास न करण्याची धमकी त्याने दिली होती. एनआयएने पन्नू विरोधात अनेक गुन्हे नोंदविले आहेत. पन्नूला जुलै 2020 पासून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशद्रोह आणि फुटिरवादाच्या आरोपांप्रकरणी दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. त्याच्या संघटनेवरही भारताकडून बंदी घालण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article