अपघातात दांडेली ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष जखमी
12:03 PM Nov 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
कारवार : ट्रॅक्टर आणि स्कूटी दरम्यान झालेल्या अपघातात दांडेली ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष आणि नगरसेवक मोहन हलवाई गंभीररित्या जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या अपघाताबद्दल समजलेली माहिती अशी, मोहन हलवाई मंगळवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान दांडेली येथील हेडपोस्ट ऑफसजवळच्या रस्त्यावरून स्कूटीवरून निघाले होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या स्कूटीला धडक दिल्याने हलवाई स्कूटीसहीत ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडले. त्यामुळे हलवाई यांच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी तातडीने हलवाई यांना दांडेली येथील सरकारी रुग्णालयात दाखल करून प्रथमोपचार केला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी धारवाड येथील एसडीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. दांडेलीनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पुढील तपास करीत आहेत.
Advertisement
Advertisement