पूर्वजांच्या अवशेषांसोबत नृत्य
स्वत:च्या नातलगांच्या मृतदेहांना थडग्यांमधून बाहेर काढत मग त्यांच्या अवशेषांसोबत नाचणे आणि आनंद व्यक्त करण्याची अजब प्रथा मादागास्करच्या एका खास समुदाय मालगासीमध्ये पार पाडली जाते. ही अत्यंत जुनी प्रथा आहे लोक याला उत्सवाप्रमाणे साजरे करतात. या अनोख्या विधीदरम्यान पूर्ण दफनभूमी अस्तव्यस्त होत असते. अनोळखी लोक जर या विधीदरम्यान तेथे पोहोचले तर त्यांना अत्यंत भीतीदायक दृश्य दिसून येईल. लोक स्वत:च्या नातेवाईकांच्या मृतदेहांचे अवशेष बाहेर काढण्यासाठी थडगी खणून काढतात. यानंतर मृतदेहांचे अवशेष बाहेर काढले जातात. थडग्यांमधून मृतदेह बाहेर काढल्यावर तेथील दृश्य अत्यंत भीतीदायक असते. सर्वत्र खणून काढलेली थडगी दिसून येतात. आसपास मृतदेहांचे अवशेषही पडलेले असतात.
अजब विधी
मादागास्करच्या मालगासी लोकांच्या थडग्यांना पाच किंवा सात वर्षांनी खणले जाते. यानंतर लोक स्वत:च्या नातेवाईकांच्या मृतदेहांचे अवशेष बाहेर काढतात. या विधीला ‘फमादिहाना’ म्हटले जाते. लोक फमादिहाना नावाच्या विधी अंतर्गत थडग्यांना खणून अवशेष बाहेर काढतात. मग त्यातील हाडं मोडतात, हा देखील या प्रथेचाच एक हिस्सा असतो.
नातेवाईकांचे मृतदेह बाहेर काढण्याचा प्रकार
लोक स्वत:च्या पूर्वजांच्या हाडांना बाहेर काढतात, मग काळजीपूर्वक त्यांना साफ करतात. मग त्यांना एका कापडात गुंडाळतात. या कापडावर मृताचे नाव लिहिले जाते, जेणेकरून त्याचा विसर पडू नये. मग साफ कपड्यांमधील मृतदेहांचे अवशेष लोक स्वत:च्या डोक्यावर ठेवतात आणि हाडांना परत त्यांच्या स्थानावर ठेवण्यापूर्वी थडग्याच्या चहुबाजूला सातवेळा संगीतावर नृत्य करतात.
फमादिहाना उत्सव
येथील लोक फमादिहानाला एका आनंददायी उत्सवाच्या स्वरुपात साजरे करतात. पूर्ण परिवार स्वत:च्या पूर्वजांना सन्मानित करण्यासाठी दूर दूरवरून प्रवास करत गावी पोहोचतात. यावेळी अन्य गावातील शेजारी आणि मित्रांनाही आमंत्रित केले जाते. सर्व एकत्र नाचणे, खाणे आणि पिण्यासाठी तयार होतात. जर आपल्या मृतांची चांगल्याप्रकारे देखभाल केली तर त्यांना दुसऱ्या जगात शांतता मिळेल आणि ते स्वत:च्या अपत्यांची मदत करू शकतील असे मालगासी लोकांचे मानणे आहे.