कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दलाई लामांना मिळावे भारतरत्न

06:48 AM Jul 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अरुणाचल प्रदेश मुख्यमंत्र्यांची मागणी : केंद्राला लिहिणार शिफारसपत्र

Advertisement

वृत्तसंस्था/ ईटानगर

Advertisement

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी तिबेटी अध्यात्मिक गुरु दलाई लामा यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारला लवकरच पत्र लिहून ही शिफारस करणार आहे. दलाई लामांचे योगदान ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या भारतासाठी अमूल्य असल्याचे पेमा खांडू यांनी म्हटले आहे.

दलाई लामांनी नालंदा बौद्ध परंपरा जिवंत ठेवणे आणि त्याला जागतिक व्यासपीठावर नेण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 8 व्या शतकात भारतून गेलेल्या गुरुंनी तिबेटमध्ये बौद्धधर्माचा प्रसार केला होता आणि मग दलाई लामांनी त्या परंपरेला भारतात पुन्हा जिवंत केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे दक्षिण भारतात अनेक बौद्ध संस्था स्थापन झाल्या, ज्याचा लाभ हिमालयीन क्षेत्रातील भिक्षू आजही घेत असल्याचे मुख्यमंत्री खांडू यांनी म्हटले आहे.

तिबेटमध्ये बौद्ध धर्माला धोका निर्माण झाल्यावर दलाई लामा भारतात आले आणि स्वत:सोबत तिबेटी बौद्ध परपंरा घेऊन आले. दलाई लामांनी भारतात प्रमुख बौद्ध संप्रदाय म्हणजेच साक्य, कग्यू आणि गदेनच्या परंपरांना पुनर्प्रस्थापित केले. आता लडाखपासून अरुणाचलप्रदेशातील भिक्षू या संस्थांमध्ये शिक्षण मिळवत आहेत असे वक्तव्य खांडू यांनी केले.

दलाई लामांची निवड

तिबेटी बौद्ध धर्म मुख्यकरून भारताच्या हिमालयीन भागांमध्ये आणि तिबेटमध्ये प्रचलित आहे. याचमुळे दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याच्या निवडीत चीनचा कुठलाही हस्तक्षेप असू नये. दलाई लामा ही व्यवस्था मागील 600 वर्षांपासून चालत आली आहे आणि ती कायम राखण्याचा निर्णय बौद्ध धर्मगुरुंकडून घेण्यात आला असल्याचे खांडू म्हणाले.

दलाई लामांच्या जन्मदिनाला उपस्थित

दलाई लामांच्या 90 व्या जन्मदिनी धर्मशाळा येथे आयोजित सोहळ्यात खांडू उपस्थित राहिले होते. ही संधी माझ्यासाठी अत्यंत खास होती. सोहळ्यात देशविदेशातून आलेल्या प्रतिनिधींनी भाग घेतला. हे आयोजन ऐतिहासिक होते असे उद्गार खांडू यांनी काढले आहेत.

विदेशी व्यक्तींनाही भारतरत्न

भारतरत्न यापूर्वीही विदेशी वंशाच्या व्यक्तींना देण्यात आल्याची आठवण खांडू यांनी करून दिली आहे. यात मदर टेरेसा, अब्दुल गफ्फार खान आणि नेल्सन मंडेला सामील आहेत. अशास्थितीत दलाई लामा यांना हा सन्मान देणे पूर्णपणे न्यायसंगत असेल. कारण त्यांनी भारताच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरांना संरक्षित करण्यासह त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली असल्याचे खांडू यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article