दक्ष पाटीलचे क्रीडा स्पर्धेत यश
11:52 AM Nov 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : जाफरवाडीचा रहिवासी दक्ष दिपक पाटीलने कर्नाटकातील कलबुर्गी येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत दर्जेदार कामगिरी केली. त्याने 3000 मी. व 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक पटकाविला. त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.दक्ष 6 कि.मी. पल्याच्या क्रॉसकंट्रीमध्ये विजेतेपद मिळविले. दक्ष सध्या ज्योती कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. त्याला प्रशिक्षकांचे आणि शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले आहे.
Advertisement
Advertisement