For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘मॅडम वेब’मध्ये डकोटा जॉन्सन

06:13 AM Dec 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘मॅडम वेब’मध्ये डकोटा जॉन्सन
Advertisement

Advertisement

फीफ्टी शेड्स ऑफ ग्रे फेम अभिनेत्री डकोटा जॉन्सनची मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये एंट्री झाली आहे. तिच्या चित्रपटाचे नाव ‘मॅडम वेब’ असून याचा दमदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच या ट्रेलरला एमसीयूच्या चाहत्यांची पसंती देखील मिळत आहे. पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अनेक फीमेल सुपरहीरोज दिसून येणार आहेत. डकोटा यात मार्व्हल युनिव्हर्समधील नवीन व्यक्तिरेखा साकारणार आहे. डकोटा जॉन्सनला जे दिसते ते अन्य कुणालाच दिसत नसल्याचे मॅडम वेबच्या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. तिला आधीच भविष्यात काय घडणार हे दिसत असते, या चित्रपटाचा व्हिलेन ब्लॅक कलरचा स्पायडरमॅनचा कॉस्ट्यूम परिधान केलेला दिसून येतो. ट्रेलरमध्ये डकोटा अॅक्शन सीन्स करताना दिसुन येत आहे.मॅडम वेब मार्व्हल कॉमिक्सवर आधारित हा आगामी अमेरिकन सुपरहिरो चित्रपट असून यात याच नावाची व्यक्तिरेखा दाखविण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. जे. क्लार्कसन यांनी केले असून सिडनी स्वीनी, सेलेस्टे ओ कॉनर, इसाबेला मर्सिड आणि ताहर रहीम यांनी यात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.