कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डकोटा जॉन्सन अन् क्रिस मार्टिनचा ब्रेकअप

06:13 AM Jun 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

8 वर्षांचे नाते संपुष्टात

Advertisement

सुमारे 8 वर्षे एकत्र राहिल्यावर कोल्डप्लेचा फ्रंटमॅन क्रिस मार्टिन आणि हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री डकोटा जॉन्सनने स्वत:चे नाते संपुष्टात आणले आहे. दोघांचाही ब्रेकअप झाला आहे.  डकोटा आणि क्रिस मार्टिन आता वेगळे झाले आहेत. डकोटा आणि क्रिस अलिकडेच भारत दौऱ्यावर होते. मुंबईत कोल्डप्ले आयोजित केल्यावर दोघांनी प्रयागराज येथे जात महाकुंभमध्ये स्नान केले होते.

Advertisement

35 वर्षीय डकोटा आणि 48 वर्षीय क्रिसच्या ब्रेकअपचे कारणही समोर आले आहे. डकोटा मुलांची इच्छा बाळगून होती, तर क्रिसला पहिल्या विवाहापासून दोन अपत्यं आहेत, याचमुळे त्याने नव्या नात्यात मुलांना जन्म देण्यास नकार दिला होता, यानंतर डकोटाने हे नातेच संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षीही त्यांचा ब्रेकअप झाला होता, परंतु त्यावेळी त्यांनी मतभेद दूर करत परत एकत्र येण्यास यश मिळविले होते. पण यंदा हे नाते कायमस्वरुपी संपुष्टात आल्याचे सांगण्यात येत आहे.

डकोटा आणि क्रिस 2017 पासून रिलेशनशिपमध्ये होते. डकोटाने क्रिसची अपत्यं एप्पल आणि मूसासोबतही चांगले नाते राखले होते. क्रिसने यापूर्वी ग्विनिथ पाल्ट्रोसोबत विवाह केला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article