महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हैदराबादच्या घटनेवर येतोय ‘दायरा’

06:03 AM Jul 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

करिना कपूर अन् आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत

Advertisement

मेघना गुलजारचा यापूर्वीचा चित्रपट ‘सॅम बहादुर’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. ‘राजी’नंतर विक्की कौशलने त्यांच्या या बायोग्राफिकल वॉर ड्रामा चित्रपटात फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली होती.  समीक्षकांनी चित्रपटातील विक्कीचा अभिनय आणि कहाणीचे कौतुक केले हेते.  या चित्रपटानंतर मेघना आता ‘दायरा’ हा नवा चित्रपट घेऊन येत आहे. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे.

Advertisement

दायरा या चित्रपटात करिना कपूर मुख्य भूमिकेत असणार आहे. मेघना गुलजारला उत्तम कहाण्यांसोबत नवी जोडी पडद्यावर सादर करण्यासाठी ओळखले जाते. आता तिच्या या नव्या चित्रपटात अत्यंत नवी जोडी पहायला मिळणार आहे. करिना कपूरसोबत पहिल्यांदाच आयुष्मान खुराना काम करणार आहे. दोघांनीही दायरा या चित्रपटात काम करण्याची तयारी दर्शविली आहे.

मेघना  या सत्यघटनेवर आधारित चित्रपट निर्माण करण्यासाठी ओळखल्या जातात. त्यांचा दायरा हा चित्रपट हैदराबादमध्ये 27 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेवर आधारित असणार आहे. सामूहिक बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला होता. तर चार आरोपींना पोलिसांनी एका चकमकीत ठार केले होते.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article