डफळापूरात १० किलो चांदीवर चोरांचा डल्ला ! रेकी करून ज्वेलर्सचे दुकान फोडले
५ लाखाचा मुद्देमाल लंपास
जत प्रतिनिधी
जत तालुक्यातील डफळापुर येथे रविवारी रात्री मुख्य बाजार पेठेतील ज्वेलर्सचे दुकान फोडण्यात आले. तब्बल दहा किलोची चांदीवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. यात पाच लाखांचा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केला आहे. या घटनेमुळे डफळापूर पा†रसरात मोठी खळबळ उडाली आहे. रेकी करून ही चोरी करण्यात आल्याचा संशय व्य‹ होत आहे.
घटनास्थळ व पोलिसांतून समजलेली माहिती अशी, डफळापूर येथे हनुमंत भगवान भोसले यांचे नेहा ज्वेलर्स नावाचे सोना-चांदीचे दुकान मुख्य बाजारपेठेतील विठ्ठल मंदिर शेजारी आहे. सध्या लग्नसराई व विविध कार्यक्रमांची रेलचेल असल्याने त्यांनी चांदीचा माल मोठ्या प्रमाणात भरला होता. रविवारी रात्री एक ते तीन दरम्यान दुकानाचे मुख्य शटर, आतील लोखंडी ग्रील आणि सेंटर लॉक तोडून आतील शोकेशमधील तब्बल दहा किलोची चांदी अज्ञात चोरांनी लंपास केली. यामध्ये दीड लाखांचे चांदीचे पैंजण, तोडे, बाळे, मासुळी, जोडवी, बिचवा, कडली या यांसह जुनी मोड असा एकूण दहा किलो चांदीचा मुद्देमाल लांबवला आहे.
सराईत चोरटयांची नजर ?
भोसले यांचे दुकानावर सीसीटीव्ही आहेत. बाजूला त्यांचे मेडिकलचे दुकान देखील आहे. शिवाय भोसले कुटुंबीय तिथेच पाठीमागे राहायला आहे. हे दुकान हनुमंत भोसले व त्यांचे वडील भगवान भोसले हे दोघे चालवतात. दुसरा कर्मचारीही दुकानात कामास नाही असे असताना चोरांनी ही चोरी सफाईदारपणे केल्याचे दुसते. फुटेज दिसणार नाही, दुकान फोडताना आवाज येणार नाही. कुणाला दिसू नये म्हणून काही डिजिटल बोर्ड आडवे लावून शांत व सराईत पद्धतीने ही चोरी केली आहे.
यामुळे काही दिवसापासून या दुकानावर चोरांची नजर असावी असे बोलले जात आहे. दरम्यान, रविवारी रात्री साडेतीनच्या सुमारास दुकानात काहीतरी आवाज येत असल्याचे भोसले कुटुंबियांच्या लक्षात आले. ते बाहेर येईपर्यंत चोरांनी पलायन केल्याचे सांगण्यात येते. चोर पळून जाताना काही चांदीच्या दागिन्यांची पाकिटे रस्त्यावर पडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. सोमवारी सकाळी श्वान पथक, ठसेतज्ञ व तांत्रिक तपास यंत्रणा पाचारण करण्यात आली. बाजारपेठेतील फुटेज तपासण्यात येत आहेत. अनोळखी एकजण काही फुटेज मध्ये दिसून आल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी मिरज उपाविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिलडा, पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी भेट दिली. दोन पथक तयार करून या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत झाली आहे. या चोरीचा तपास पोलीस उपा†नरीक्षक गायकवाड करत आहेत.
रेकीचा संशय, तपास गतीने : निरीक्षक सूरज बिजली
जतचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली म्हणाले, या चोरीचा तपास आम्ही गतीने सुरू केला आहे. तपास कामी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. एलसीबीकडून देखील समांतर तपास सुऊ आहे. ही चोरी रेकी करून आणि सराईत गुन्हेगारांनी केल्याचा संशय आहे. शिवाय फुटेजमध्ये एक आरोपी दिसत असला तरी अन्य साथीदार असणार आहेत. दुकानाचे सेंटर लॉक सहज तुटत नाही. यावरून ही चोरी सराईत चोरट्यांकडून झाल्याचा प्राथमिक संशय आहे.