डाबर इंडियाने कमावला 515 कोटीचा नफा
07:00 AM Nov 10, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली : डाबर इंडिया या कंपनीने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये 515कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदला आहे. उत्पादनांना सदरच्या कालावधीमध्ये चांगली मागणी राहिल्याने कंपनीला यावर्षी मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये नफ्यामध्ये 5 टक्के वाढ नोंदवता आली आहे. एफएमसीजी क्षेत्रातील डाबर इंडियाने 490 कोटी रुपयांचा निव्वळ नफा याच अवधीत मागच्या वर्षी कमावला होता. कंपनीने याच अवधीत 3203 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला असून तो मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 7.3 टक्के अधिक आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article