दबंग दिल्ली, यू मुम्बा विजयी
वृत्तसंस्था / विझाग
2025 च्या प्रो कब•ाr लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात दबंग दिल्लीने गुजरात जायंट्सचा 38-28 अशा 10 गुणांच्या फरकाने पराभव केला तर या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात यू मुम्बाने पाटणा पायरेट्सवर 40-39 असा निसटता विजय मिळविला.
या स्पर्धेत खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात दबंग दिल्लीचा कर्णधार आशु मलिकने आपल्या चढायांवर 14 गुण तर फजल अत्राचलीने 5 गुण मिळविले. 2025 च्या प्रो कब•ाr लीग हंगामात दबंग दिल्लीने आतापर्यंत आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. स्पर्धेच्या गुणतक्त्यात दबंग दिल्ली पहिल्या स्थानावर आहे. दबंग दिल्ली आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामन्यात पहिल्या 10 मिनिटांमध्ये दबंग दिल्लीने गुजरात जायंट्वर 8-6 अशी आघाडी घेतली होती. दबंग दिल्लीच्या अजिंक्य पवार आणि अशु मलिक यांनी आपल्या चढायांवर 5 गुण वसुल केले. गुजरात जायंट्सतर्फे आर्यवर्धन नवलेने तीन गुण तर राकेशने आपल्या चढायांवर 2 गुण वसुल केले. त्यानंतर दबंग दिल्लीने मध्यंतराला दोन मिनिटे बाकी असताना गुजरात जांयट्सचे सर्वगडी बाद केल्याने मध्यंतरावेळी दबंग दिल्लीने 21-14 अशी आघाडी मिळविली होती.सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर दबंग दिल्लीने पुन्हा एकदा गुजरात जायंट्सचे सर्वगडी बाद केले. सामना संपण्यास 10 मिनिटे बाकी असताना दबंग दिल्लीने 31-21 अशी आघाडी मिळविली होती. पण शेवटच्या 5 मिनिटांत दबंग दिल्लीने आणखी सात गुण वसुल केले तर गुजरात जायंट्सने 7 गुण मिळविले. त्यामुळे हा सामना अखेर दबंग दिल्लीने 38-28 अशा गुणांनी जिंकला.
यू मुम्बा विजयी
अन्य एका सामन्यात यू मुम्बा आणि पाटणा पायरेट्स या दोन्ही संघांचा खेळ शेवटच्या क्षणापर्यंत दर्जेदार झाला. हा सामना अटितटीचा राहिला आणि शेवटच्या क्षणी यु मुम्बाने पाटणा पायरेट्सवर 40-39 अशा केवळ एका गुणाच्या फरकाने विजय मिळविला. या सामन्यात यु मुम्बा संघातील आयान लोचाबने सलग 20 गुण मिळविण्याचा नवा विक्रम केला आहे. यु मुम्बातर्फे झेफरादानिशने सुपर 10 गुण नोंदविले.