महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आशू मलिकच्या सुपर 10 मुळे दबंग दिल्ली-पुणेरी पलटन लढत टाय

06:42 AM Nov 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नोएडा, उत्तर प्रदेश

Advertisement

आशू मलिकने सलग आठव्या सामन्यात मिळविलेल्या सुपर 10 मुळे दबंग दिल्ली केसीने प्रो कबड्डी लीगमधील 50 व्या सामन्यात पुणेरी पलटनविरुद्ध 38-38 अशी रोमांचक बरोबरी साधत सामना टाय केला.

Advertisement

हंगामी कर्णधार असलेल्या आशू मलिकने या सामन्यात एकूण 17 गुण नोंदवल्याने दबंग दिल्लीला बरोबरी साधत एक गुण मिळविता आला. कर्णधार अस्लम इनामदारच्या गैरहजेरीत आकाश शिंदेने पुणेरी पलटनच्या आक्रमणाला सुरुवात केली. चमकदार सुरुवात करून दिल्यानंतर पलटनच्या अमन व अभिनेश नादराजन या बचावपटूंनी हा जोम पुढे चालू ठेवताना महत्त्वाचे टॅकल पॉईंट्स मिळविले. दहाव्या मिनिटाला मोहित गोयतने गुण मिळवित दबंग दिल्लीला पहिल्यांदा ऑलआऊट केले. पण नवीन कुमारच्या गैरहजेरीत आशू मलिकने चढाई करीत या मोसमात शंभर रेड गुण मिळविणारा पहिला रायडर होण्याचा मान मिळविला. त्याच्यामुळेच दिल्लीचे आव्हान कायम राहिले.

त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीने जोरदार आक्रमण करीत मुसंडी मारली. पण पलटनच्या अमन व अभिनेष या बचावपटूंनी दर्जेदार खेळ करीत अनेक सुपर टॅकल्स करीत गुण मिळविले. पूर्वार्धातच अमनने हाय 5 मिळविले आणि यावेळी पलटनने 21-13 अशी बढत घेतली होती.

उत्तरार्धाच्या सुरुवातीला आशू मलिकने सुपर 10 गुण पूर्ण केले. मात्र त्याला सहकाऱ्यांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. युवा खेळाडूंचा भरणा असणाऱ्या पलटनने मात्र एकसंध कामगिरी करीत विजयाच्या दिशेने प्रयत्न सुरू ठेवले. शेवटची दहा मिनिटे असताना दिल्ली बचावफळी पुन्हा एकदा ठिसूळ ठरली आणि पलटनने त्यांना दुसऱ्यांदा ऑलआऊट केले.

दिल्लीच्या हातून सामना निसटतोय असे वाटत असताना आशू मलिकने जबरदस्त खेळ केला. त्याच्या सुपर रेडने संकेद सावंत, मोहित गोयत, अमन यांना बाद केले. शिवाय पलटनला ऑलआऊट करीत बाजू पलटवली. अत्यंत आवश्यकता असताना दिल्लीच्या बचावपटूंनीही शानदार प्रदर्शन केले. दोन मिनिटे असताना त्यांना गुणांचा फरक फक्त एका गुणावर आणला. यावेळी गौरव चिल्लरने पंकज मोहितेला यशस्वी टॅकल केले. शेवटून दुसऱ्या रेडवर गौरव खत्रीला बाद करीत आशूने दिल्लीला बरोबरी साधून दिली. यावरच सामना संपल्याची घोषणा झाली. शेवटच्या दहा मिनिटांत दिल्लीने 15 गुणांची कमाई करीत सामना टाय केला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article