कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढणार?

06:11 AM Mar 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

येत्या आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ आणि महागाई सवलत मिळणार आहे. येत्या आठवड्यात डीए/डीआर वाढीची घोषणा केली जाऊ शकते. सध्या डीए/डीआर 46 टक्के दराने दिला जात आहे. महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्क्मयांवर पोहोचताच सरकारला आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2024 पासून त्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ अपेक्षित आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डीएच्या दरात वाढ होण्याची शक्मयता आहे. गेल्या वर्षाच्या उत्तरार्धात केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्मयांनी वाढ केली होती. त्यानंतर महागाई भत्त्याचा म्हणजेच ‘डीए’चा दर 42 टक्क्मयांवरून 46 टक्के झाला. आता 1 जानेवारी 2024 पासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ होण्याची शक्मयता आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्मयांनी वाढत आहे. यावषीही डीएचे दर चार ते पाच टक्क्मयांनी वाढू शकतात. तसे झाल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन सुधारले जाईल. पगाराशिवाय त्यांचे अनेक भत्तेही वाढतील. भारत सरकारच्या श्र्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या लेबर ब्युरोने जानेवारी 2024 चा अखिल भारतीय सीपीआय-आयडब्ल्यू अहवाल 29 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केला आहे. यामध्ये औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक 138.9 अंकांच्या पातळीवर संकलित करण्यात आला आहे. अखिल भारतीय ‘सीपीआय-आयडब्ल्यू’ने 0.1 अंकांची वाढ नोंदवली

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article