महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डी मिनॉर, सिनेर, स्वायटेक चौथ्या फेरीत

06:58 AM Sep 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेदवेदेव्ह, बियाट्रिझ हदाद, टॉमी पॉल, ड्रेपरही विजयी, झान्डस्कल्प पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

Advertisement

ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉर, ब्राझीलची बियाट्रिझ हदाद माइया, पोलंडची अग्रमानांकित इगा स्वायटेक, अग्रमानांकिन जेनिक सिनेर, रशियाचा डॅनील मेदवेदेव्ह, टॉमी पॉल, जॅक ड्रेपर यांनी एकेरीची चौथी फेरी गाठली तर कार्लोस अल्कारेझला दुसऱ्या फेरीत हरविणाऱ्या बोटिक व्हान डी झान्डस्कल्पचे आव्हान संपुष्टात आले.

डी मिनॉरने तिसऱ्या फेरीत ब्रिटनच्या डॅन इव्हान्सचा 6-3, 6-7 (7-4), 6-0, 6-0 असा धुव्वा उडवित चौथी फेरी गाठली. एका वर्षात चारही ग्रँडस्लॅम स्पर्धांची चौथी फेरी गाठणारा तो ऑस्ट्रेलियाचा पहिला टेनिसपटू आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये चौथी फेरी, प्रेंच ओपन व विम्बल्डनमध्ये त्याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. त्याच्या ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्सी पॉपीरिन व जॉर्डन थॉम्पसन यांनीही चौथी फेरी गाठली आहे. डी मिनॉरची पुढील लढत थॉम्पसनशीच होणार आहे. अन्य एका सामन्यात अग्रमानांकित सिनेरने चौथी फेरी गाठताना ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस्तोफर ओ’कॉनेलचा 6-1, 6-4, 6-2 असा फडशा पाडला. अल्कारेझ व जोकोव्हिच पराभूत झाल्यानंतर टॉप तीनमधील सिनेर हा एकमेव खेळाडू राहिला आहे. सिनेरने या सामन्यात 15 बिनतोड सर्व्हिस करताना 46 विजयी फटकेही मारले. सिनेरनेही या वर्षातील चारही ग्रँडस्लॅम स्पर्धांची चौथी फेरी गाठली आहे.

मेदवेदेव्ह विजयी

पाचव्या मानांकित रशियाच्या मेदवेदेव्हने इटलीच्या फ्लॅविओ कोबोलीवर 6-3, 6-4, 6-3 अशी मात करीत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. मेदवेदेव्ह हा एकमेव माजी चॅम्पियन मुख्य ड्रॉमध्ये राहिला आहे. त्याची पुढील लढत पोर्तुगालच्या नुनो बोर्जेसशी होईल. टॉमी पॉलने कॅनडाच्या पात्रता फेरीतून आलेल्या गॅब्रियल डायलोचा 6-7 (5-7), 6-3, 6-1, 7-6 (7-3) असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव केला. सिनेरशी त्याची पुढील लढत होईल. अन्य एका सामन्यात ब्रिटनच्या जॅक ड्रेपरने नेदरलँड्सच्या बोटिक व्हान डी झान्डस्कल्पवर 6-3, 6-4, 6-2 अशी मात करीत त्याची घोडदौड रोखली. बोटिकने याआधी कार्लोस अल्कारेझला पराभवाचा धक्का दिला होता. टॉमस मॅकहॅकशी ड्रेपरची पुढील लढत होईल. मॅकहॅकने बेल्जियमच्या डेव्हिन गॉफिनचे आव्हान 6-3, 6-1, 6-2 असे संपुष्टात आणत चौथी फेरी गाठली.

बियाट्रिझ हदाद, स्वायटेकची आगेकूच

महिला एकेरीत ब्राझीलच्या बियाट्रिझ हदाद माइयाने चौथी फेरी गाठताना अॅना कॅलिन्स्कायाचा 6-3, 6-1 असा पराभव केला. या सामन्यात एका वादग्रस्त व्हिडिओ रिव्ह्यूवरून काही वेळ वाद निर्माण झाला होता. पहिल्या सेटवेळी ही घटना घडली. या कॉलमुळे सामन्यालाच कलाटणी मिळाल्यामुळे व्हिडिओ रिव्ह्यू सिस्टिमबद्दल शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. कॅलिन्स्कायाने रिव्ह्यूची मागणी केली होती. माइयाने डबल बाऊन्सवर गुण मिळविला असे तिला वाटल्याने तिने ही मागणी केली होती. पण रिव्ह्यूमध्येही माइयाचा फटका वैध असल्याचा निर्णय दिला गेला. अन्य एका सामन्यात पोलंडच्या इगा स्वायटेकने रशियाच्या अॅनास्तेशिया पाव्हल्युचेन्कोव्हाचा 6-4, 6-2 असा पराभव करून चौथी फेरी गाठली. पाव्हल्युचेन्कोव्हा महिलांच्या क्रमवारीत 27 व्या स्थानावर आहे. तिने यापूर्वी सातवेळा ग्रँडस्लॅम स्पर्धांची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. स्वायटेकने ही स्पर्धा 2022 मध्ये जिंकली होती. तिची पुढील लढत रशियाच्या 16 व्या मानांकित ल्युडमिला सॅमसोनोव्हाशी होईल.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article