कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डी.के.हेरेकर ज्वेलर्सच्या वर्धापनदिनाची लकी ड्रॉ सोडत उत्साहात

12:41 PM Nov 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ग्राहकांनी जिंकली दुचाकी, टीव्ही, फ्रीजसह 45 आकर्षक बक्षिसे

Advertisement

बेळगाव : खडेबाजार येथील नामांकित डी. के. हेरेकर ज्वेलर्स यांच्या सुवर्ण दालनाच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त तसेच दसरा-दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या बंपर ऑफरचा समारोप रविवारी मिलेनियम गार्डन येथे झालेल्या भव्य लकी ड्रॉ सोडतीने उत्साहात झाला. 22 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या या विशेष योजनेत सोन्या-चांदीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कूपन्स देऊन दुचाकी, स्मार्ट टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाईल आदी आकर्षक बक्षिसांची संधी देण्यात आली होती.

Advertisement

या सोहळ्यास बीएस्सी मॉलचे मालक चंद्रशेखर तसेच उपमहापौर वाणी जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच रामनाथ चोडणकर (कोल्हापूर) यांचीही विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन सुवर्ण दालनाचे संस्थापक आणि मालक दिलीप कृष्णा हेरेकर, अतुल दिलीप हेरेकर आणि ओंकार दिलीप हेरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. लकी ड्रॉ सोडतीत प्रथम क्रमांकाची दुचाकी हिरो डेस्टिनी हे मुख्य बक्षीस प्रज्योत जोतिबा गाडेकर, कंग्राळ गल्ली, बेळगाव यांनी पटकावले.

द्वितीय क्रमांकाचे 55 इंच स्मार्ट टीव्ही अमन चौधरी, बेळगाव यांच्या नावे निघाले. तृतीय क्रमांकाचे 270 लिटर डबलडोअर फ्रीज डॉ. अरुण शेट्टी, बेळगाव यांनी जिंकले. चौथ्या क्रमांकाचे वॉशिंग मशीन मनाली हंडे, मुतगे यांनी जिंकले. याशिवाय आणखी 45 मोठी पारितोषिके जाहीर करण्यात आली. सर्व सहभागींसाठी प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून रु. 500 कॅशबॅक व्हाऊचर देण्यात आले. शहापूर येथील मुख्य शोरुम, बेळगाव खडेबाजार येथील दुसऱ्या शाखेत उपलब्ध असलेल्या या योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सणासुदीच्या खरेदीसोबत आकर्षक बक्षिसांची दुहेरी संधी मिळाल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article