For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लग्नसमारंभावेळी सिलिंडरचा स्फोट

06:37 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
लग्नसमारंभावेळी सिलिंडरचा स्फोट
Advertisement

एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू : फटाक्यांच्या आतषबाजीनंतर आगीचा भडका

Advertisement

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहारमधील दरभंगा येथील बहेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंतोर गावात गुरूवारी रात्री छगन पासवान यांच्या मुलीचे लग्न पार पडले. रामचंद्र पासवान यांच्या निवासी संकुलात बसवण्यात आलेल्या शामियान्यात लग्नातील पाहुण्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. लग्नाची मिरवणूक आल्यानंतर प्रचंड आतषबाजी करण्यात आली. त्याची ठिणगी शामियान्यावर पडल्यानंतर काही वेळातच संपूर्ण मंडपाने पेट घेतला. याचदरम्यान मंडपात ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Advertisement

फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मंडपाला आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ जमा झाले. घटनास्थळी उपस्थित पाहुणे मंडळींसह अन्य लोकांनी आग आटोक्मयात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. यादरम्यान आगीच्या ज्वाळांनी तेथे ठेवलेल्या सिलिंडरला वेढले आणि मोठा आवाज होऊन सिलिंडरचा स्फोट झाला. सिलिंडरच्या स्फोटातून निघालेल्या ज्वाळा रामचंद्र पासवान यांच्या दारात ठेवलेल्या डिझेलच्या साठ्यापर्यंत पोहोचल्यामुळे आगीने भीषण रूप धारण केले आणि त्यांच्या कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला. तसेच तीन गुरेही जळून खाक झाली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पीडित कुटुंबाला शासकीय स्तरावर सर्व प्रकारची मदत देण्यास सुऊवात केली. आगीची माहिती रात्री 11.15 च्या सुमारास मिळाल्यानंतर स्टेशन प्रभारी आणि अग्निशमन अधिकारी पाठवण्यात आले. बऱ्याच प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी दरभंगा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक जगुनाथ रे•ाr यांनी दिली.

Advertisement
Tags :

.