For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंध्रला धडकणार मिचौंग चक्रीवादळ

06:33 AM Dec 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
आंध्रला धडकणार मिचौंग चक्रीवादळ
Advertisement

तीन राज्यांमध्ये जोरदार वारा, पावसाचा इशारा

Advertisement

► वृत्तसंस्था/ चेन्नई

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी खोल दाबात रूपांतरित झाले. येत्या 24 तासांत ते चक्रीवादळाचे रूप धारण करेल, असे भारतीय हवामान विभागाने शनिवारी स्पष्ट केले. म्यानमारने या वादळाला मिचौंग असे नाव दिले आहे. 3 डिसेंबरपासून हे वादळ उत्तर-पश्चिम दिशेने सरकणार आहे. हे वादळ 5 डिसेंबरला सकाळी आंध्रप्रदेशातील नेल्लोर आणि मछलीपट्टणम किनारपट्टी येथे धडक देणार आहे. यावेळी वादळाचा वेग ताशी 80-90 किमी असेल. ते ताशी 100 किमीपर्यंत पोहोचू शकते, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे आंध्रप्रदेशसह तामिळनाडू, ओडिशा आणि पाँडिचेरीमध्ये विशेष दक्षता घेण्यात आली आहे.

Advertisement

3 डिसेंबरपासून तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश किनारपट्टीवर वारे आणि पावसाचा जोर वाढेल. दक्षिण कोस्टल आंध्र प्रदेशात तुरळक मुसळधार ते अतिवृष्टीसह मध्यम पावसाची शक्मयता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्रप्रदेशातील नागपट्टणम जिह्यातील वेलंकन्नी समुद्रकिनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याचे विशाखापट्टणम चक्रीवादळ इशारा केंद्राच्या एमडी सुनंदा यांनी सांगितले. मिचौंग हे चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे चौथे आणि हिंदी महासागरातील 2023 मध्ये सहावे वादळ आहे.

आंध्रप्रदेशात 3 आणि 4 डिसेंबर रोजी रायलसीमा येथे हलक्मया ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तसेच ओडिशाच्या किनारी भागात 4-5 डिसेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्मयता आहे.

Advertisement
Tags :

.