महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माजी नगरसेवकांना जाळ्यात ओढण्याचा सायबर गुन्हेगारांचा प्रयत्न

06:36 AM Oct 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खबरदारीमुळे फसवणूक टळली : सीईएन पोलिसात गुन्हा दाखल

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

सायबर गुन्हेगारांच्या कारवाया थांबता थांबेनात. टेलिकॉम, पोलीस, सीबीआयच्या नावाने बेळगावातील अनेकांना फोन कॉल सुरूच आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राशी तुमचा आर्थिक व्यवहार आहे, असे सांगत सायबर गुन्हेगारांनी बेळगाव येथील एका माजी नगरसेवकांना लुटण्याचा प्रयत्न केला आहे.

माजी नगरसेवक विजय लक्ष्मणराव पाटील, रा. हिंदवाडी यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांची फसवणूक टळली असून सायबर गुन्हेगारांकडून आलेले सततचे फोन कॉल व फसवणुकीसाठी त्यांनी विणलेले जाळे आदींमुळे त्यांना बराच मन:स्ताप झाला आहे. यासंबंधी विजय पाटील यांनी बुधवारी येथील सीईएन पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.

दि. 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास विजय पाटील यांना एक फोन कॉल येतो. आम्ही मुंबई टेलिकॉममधून बोलत आहोत. घाटकोपरला तुमच्या नावे एक सीमकार्ड खरेदी केले आहे. या सीमकार्डवरून गुन्हे करण्यात आले आहेत. मुंबई येथील पंतनगर पोलीस स्थानकात तुमच्यावर 27 गुन्हे दाखल आहेत. तुमच्या नावे खरेदी केलेल्या सीमकार्डमुळे झालेल्या गुन्हेगारीने एकाने आत्महत्याही केली आहे, असे सांगण्यात आले.

अचानक आलेल्या या फोन कॉलमुळे विजय पाटील यांना धक्का बसला. आपण बेळगावात राहतो. आपल्याकडे एकच मोबाईल क्रमांक आहे. मुंबईत सीमकार्ड खरेदी करण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगूनही पलीकडची व्यक्ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. तुमची चौकशी करायची आहे, दोन तासांत मुंबईत दाखल व्हा, असा आदेश देण्यात आला.

दुसऱ्या दिवशी पुन्हा व्हिडिओ कॉल सुरू झाले. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याशी संभाषण करण्यात आले. तुम्ही राज कुंद्राला ओळखता का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यांच्याबरोबर तुमचे आर्थिक व्यवहार आहेत. हे प्रकरण आम्ही चौकशीसाठी सीबीआयकडे देतो. तुम्ही सीबीआय अधिकाऱ्यांशी बोला, असे सांगून तिसऱ्या माणसाला फोन देण्यात आला. त्याने कारवाईची धमकी दिली. विजय पाटील यांचे आधारकार्ड व इतर माहिती मागविण्यात आली. चौकशी पूर्ण होईपर्यंत 5 लाख 18 हजार रुपये डिपॉझिट भरा, चौकशीत जर तुम्ही दोषी ठरला नाही तर ही रक्कम तुम्हाला परत मिळेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे विजय पाटील यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी सायबर गुन्हेगारांशी संपर्क तोडला. म्हणून त्यांची फसवणूक टळली. बेळगाव परिसरात असे प्रकार नित्याचेच झाले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article