For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सायबर दरोडेखोरांचे जमतारा मॉड्यूल !

06:54 AM Jul 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
सायबर दरोडेखोरांचे जमतारा मॉड्यूल
Advertisement

जगात आत्तापर्यंत दोन महायुद्धे झाली आहेत. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. यामध्ये सायबर यंत्रणेची बऱ्यापैकी साथ असल्याचे सध्या रशिया-युक्रेन, इराण-इस्त्रायल आणि भारताने दहशतवाद्याविरोधात राबविलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगाने पाहिले आहे. मात्र हे सायबरचे यंत्र समाजकंटकांच्या हातात पडले असून, खुलेआम त्यांनी नागरिकांना ‘सळो की पळो’ कऊन सोडले आहे. यामुळे देशात सुऊ झालेल्या सायबर दरोडेखोरांच्या जमतारा मॉड्यूलच्या मुसक्या लवकरात लवकर आवळणे आवश्यक आहे.

Advertisement

देशांत सायबर फसवणूक म्हटली की ‘जमतारा’ हे नाव डोळ्यासमोर येते. झारखंडमधील जमतारा जिह्यातील बहुतांश मंडळी सायबर फसवणुकीत सक्रिय आहेत. ‘जमतारा’ नावाने एक वेबसिरीज आल्यानंतर हे मॉड्यूल समोर आले. जमतारा जिह्यात सर्वाधिक सायबर भामटे असून ते देशभरात विविध सायबर गुह्यात सक्रिय आहेत. तर काही सायबर भामटे हे देशातील विविध राज्यात सक्रीय आहेत. दिल्लीतील नोएडा सेक्टर तर गुन्हेगारांचा अ•ा बनला आहे. बोगस कॉल सेंटरपासून ते सायबर ठगी अशी चुना लावणारी दुकानदारी येथुन सुऊ आहे. या सर्वांचे बऱ्यापैकी कनेक्शन हे छत्तीसगढ राज्यातील जमतारा येथे आहे. यामुळे सायबर दरोडेखोरांच्या जमतारा मॉड्यूलचा लवकरच पर्दाफाश करणे आवश्यक आहे. तरच देशातील नागरिक खऱ्या अर्थाने सुटकेचा श्वास घेईल.

जमतारा मॉड्यूलच्या सायबर जाळ्यात अनेकजणांनी आपल्या आयुष्याची पुंजी पणाला लावली आहे. तर फसवणूकीची रक्कम ही देशातील विविध बँकामध्ये जमा केली जात असल्याचे आढळून आले आहे. त्यातच छत्तीसगढमधील बस्तर जिह्यात फसवणुकीचा एक गुन्हा दाखल होता. या गुह्यातील रक्कम मुंबईतील बॅंक खात्यात वळती करण्यात आली होती. ती रक्कम काढण्यासाठी सायबर भामटे मुंबईत आल्याची माहिती कांदिवली पोलिसांच्या सायबर कक्षाला मिळाली होती. त्यानुसार सायबर कक्षाने कांदिवली येथील एका हॉटेलामध्ये छापा टाकून तीन सायबर भामट्यांना अटक केली. त्यांच्याकडून बॅंकांची 56 एटीएम कार्डे, आठ मोबाईल आणि 90 हजार ऊपये जप्त करण्यात आले. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक करीत आहेत. फसवणुकीतून आलेले पैसे थेट आपल्या खात्याऐवजी दुसऱ्या बॅंक खात्यात वळते करतात. त्याला ‘थर्ड पार्टी अकाऊंट’ असे म्हटले जाते. काही व्यक्तींना कमिशन देण्याचे आमिष दाखवून त्यांची बॅंक खाती उघडली जातात, तर अनेकांच्या आधार कार्डाचे तपशील मिळवून त्या आधारे अशी बॅंक खाती उघडण्यात येतात. त्या बॅंक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येते.

Advertisement

फसवणुकीचे पैसे अशा खात्यात आले की सायबर भामटे ती रक्कम काढतात. लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली मुंबईत अशाप्रकारे शेकडो बॅंक खाती उघडण्यात आली होती. सायबर भामट्याच्या जाळ्यात भले भले शिक्षित नागरिक देखील अडकले आहेत. एअर इंडियातून निवफत्त झालेल्या एका अधिकाऱ्याची डिजीटल अरेस्टची भीती दाखवून 67 लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. मालाड येथील रहिवाशी असलेले तक्रारदार एअर इंडियामधून निवफत्त झाले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एका अज्ञात व्यक्तीने तक्रारदाराला कॉल करून तो ट्रायचा कर्मचारी असल्याचे सांगून त्यांच्या नावाने सिमकार्ड घेतले होते. त्यावरून आरोपी विविध भागात लोकांना कॉल करून त्रास देत होता. त्यामुळे तक्रारदाराविऊद्ध दिल्लीत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तक्रारदाराला दुसऱ्या अज्ञात व्यक्तीने कॉल करून तो सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी केली होती. तसेच तक्रारदाराच्या कागदपत्रांचा गैरवापर करून विविध बँकेत खाते उघडण्यात आले आहे. त्यात ड्रग्ज, मनी लॉड्रिंग, मानव तस्करीसह अवैध धंद्याचे लाखो ऊपये जमा झाले आहेत, असे सांगून तक्रारदाराची फोनवरूनच चौकशी सुरू केली होती. तक्रारदाराला डिजीटल अरेस्टची धमकी देऊन त्यांना त्यांच्या बँक खात्यातील पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगितले होते. त्यामुळे तक्रारदाराने संबंधित बँक खात्यात सुमारे 67 लाख ऊपये ट्रान्स्फर केले होते. त्यासाठी तक्रारदाराने त्यांचे एफडी आणि म्युच्युअल फंड मोडले होते. मात्र नंतर आरोपीने कॉल केला नाही किंवा तक्रारदाराची पुन्हा चौकशी केली नाही. तसेच 67 लाखांची रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्स्फरही केली नाही. त्यानंतर तक्रारदाराने सायबर सेल पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच गेल्या पाच महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या तिघांना गुजरात येथून पोलिसांनी अटक केली.

आपल्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल येतो तेव्हा कॉल करणाऱ्या सायबर भामट्याच्या पाठीमागे पोलीस किंवा सीबीआय कार्यालय असल्याचे फोटो दिसतात. फोन करणारा भामटा बऱ्याचदा खाकी वर्दीत असतो. आपल्याविऊद्ध अटकेचे वॉरंट आहे. आपण गुन्हेगार आहात. आपणास डिजिटल अटक करण्यात आली आहे. तुम्ही ड्रग्जच्या तस्करीत गुंतलेले आहात किंवा आपल्या आधारकार्डाचा गैरवापर झाला आहे. आता आपली या प्रकरणातून सुटका नाही. आपल्याविऊद्धची कारवाई जर थांबवायची असेल तर आम्ही सांगतो त्याप्रमाणे करा! आम्ही दिलेल्या बँक खात्यात पैसे जमा करा. आरटीजीएस करा. असे न केल्यास तुम्हाला परिणाम भोगावे लागतील. सायबर भामट्यांच्या या व अशा धमक्यांनंतर बहुसंख्य स्त्राr-पुऊष घाबरतात. घरातील कुणाला न सांगता आपल्या बँक खात्यातील पैसे सायबर माफियांनी नमूद केलेल्या बँक खात्यात ट्रान्सफर करतात. वारंवारच्या धमक्यांना घाबरून आपल्या बँक एफडी मोडतात. घरात असलेले सारे दागिनेही विकतात. बँक खात्यात, घरात काहीच शिल्लक राहत नाही तेव्हा फसलेले स्त्राr-पुऊष पोलिसांकडे धाव घेतात. तेव्हा वेळ निघून गेलेली असते.

हे केवळ देशातील सायबर भामटे किंवा जमतारा मॉड्यूल करीत नाही. तर देशातील ज्येष्ठ नागरिकांना देशोधडीला लावणारे सायबर माफिया परदेशी देखील आहेत. सायबर माफियांनी चीन, म्यानमार, कंबोडिया, दुबई, स्वित्झर्लंडमधील दावोस आदी देशांत कॉल सेंटर्स उभारली आहेत. त्यात बहुसंख्य भारतीय तऊणांची भरती करण्यात आलेली आहे. नोकरी शोधत असलेल्या भारतीय तऊणांची दिशाभूल करून त्यांना कॉल सेंटरमध्ये बसविले जाते. हीच तऊण पोरं भारतीयांना फोन करतात आणि करोडो ऊपयांना गंडा घालतात. हा गुन्हा आहे. आपली फसवणूक झाली आहे असे लक्षात आल्यावर भारतीय तऊण मुलं पुन्हा भारतात परतण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा परदेशी सायबर माफिया त्या तऊणांचे पासपोर्ट काढून घेतात. कॉल सेंटरमध्ये काम करण्यासाठी त्यांच्यावर जबरदस्ती करतात. अलीकडेच म्यानमारमधील कॉल सेंटरमध्ये अडकलेल्या 600 भारतीय तऊणांची मुंबई क्राईम बँचच्या अधिकाऱ्यांनी सुटका केली. त्यात महाराष्ट्रातील 30 तऊणांचा समावेश होता. याप्रकरणी वर्तमानपत्रातील फसव्या जाहिराती पाहून तऊणांना परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या दोन एजंटनाही अटक करण्यात आली होती. तेव्हा नोकरीच्या शोधात असलेल्या तऊणांनो सावधान. वर्तमानपत्रातील जाहिराती व एजंटवर विश्वास ठेवू नका. परदेशी नोकरीच्या मोहात पडू नका. सायबर माफिया म्हणून एकदा तुमच्यावर शिक्का बसला तर तुम्ही आयुष्यातून उठाल, फसल्या गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांची ‘हाय’ लागेल. तर दुसरीकडे तपास यंत्रणांनी देखील अशा प्रकारे सुऊ असलेल्या सायबर दरोडेखोरांच्या जमतारा मॉड्यूलचा पर्दाफाश करणे आवश्यक आहे.

- अमोल राऊत

Advertisement
Tags :

.