कापून जारमध्ये ठेवते अवयव
बाटलीत सजविलेत नाक, कान, जीभ
सर्वसाधारणपणे आपण सुंदर दिसावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु जगातील प्रत्येक जण असा विचार करत नाही. काही जणांना निसर्गानेच सुंदर रुप दिले आहे, तरीही त्यांना ते सांभाळता येत नाही. काही लोक स्वत:च्या चांगल्या शरीराचे नुकसान स्वत:च करून घेतात. टॉक्सी नावाच्या एका बेल्जियन महिलेला विचित्र छंद आहे. लोक परफेक्ट दिसू इच्छितात तर टॉक्सी खराब दिसण्यासाठी स्वत:च्या शरीराचे नुकसान करवून घेते. तिला पाहून कुणीच प्रथम घाबरून जातो. सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्याप्रमाणे तिचा चेहरा राहिलेला नाही. ज्या गोष्टी सर्वसामान्यांना विचित्र वाटतात, त्याबद्दल तिला कुठलाही पश्चाताप नाही.
31 वर्षीय टॉक्सी पूर्वी सामान्य युवती होती. परंतु बॉडी मॉडिफिकेशन करवून घेण्याचे व्यसन तिला जडले, तिने स्वत:च्या शरीराच्या प्रत्येक हिस्स्यावर टॅटू काढून घेतले आहेत. याचबरोबर शरीराचा बराचसा हिस्सा इंकने पूर्ण काळा करवून घेतला आहे. तिने स्वत:च्या डोक्यावर शिंगही लावून घेतली आहेत. तसेच स्वत:च्या जिभेला दोन हिस्स्यांमध्ये विभागले आहे. तिच्या कानाचा वरील आणि खालचा हिस्सा तिने कापून घेतला आहे. शिंगं उगविणं माझ्यासाठी सर्वात वेदनादायी होते, या वेदना 8 आठवड्यांनी कमी झाल्याचे ती सांगते.
तिने स्वत:च्या शरीराच्या हिस्स्यांना छोट्या जारमध्ये ठेवले आहे. माझ्या शरीरात बदल मी फरफेक्ट दिसू नये म्हणून करत आहे. जो फरफेक्ट नसतो, तोच अनोखा असतो असे तिचे सांगणे आहे. तिच्या शरीरावर कापल्याचे आणि जाळल्याचे डागही तयार करविण्यात आले आहेत. अशाप्रकारे दिसणे प्रत्येकाला आवडत नाही. काही लोक मला पाहून घाबरतात, परंतु तरीही मी शरीरात बदल करविण्यासाठी तयार असल्याचे टॉक्सी सांगते.