कोचिंग सेंटर दुर्घटनेच्या 6 आरोपींच्या कोठडीत वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या ओल्ड राजेंद्र नगर कोचिंग सेंटर दुर्घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 6 जणांची न्यायालयीन कोठडी 18 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. यादरम्यान या सर्व आरोपींची सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे. राऊ आयएएस स्टडी सर्कलच्या तळघरात पाणी भरल्याने तेथे बसून अभ्यास करत असलेल्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.
श्रेया यादव, तान्या सोनी आणि नेविन डालविन यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी निदर्शने केली होती. या पार्श्वभूमीवर दिल्ली महापालिकेने तळघरात चालविण्यात येणाऱ्या अनेक कोचिंग सेंटर्सना टाळे ठोकले होते. तसेच अनेक कोचिंग सेटर्सना नोटीस बजावण्यात आली होती.
कोचिंग सेंटर दुर्घटनेप्रकरणी सीबीआयने राऊ आयएएस स्टडी सर्कलचे सीईओ अभिषेक गुप्ता, कोचिंग सेंटरचे चार मालक तजिंदर सिंह, हरविंदर सिंह, सरबजीत सिंह आणि परविंदर सिंह यांच्यासह देशपाल सिंह यांना आरोपी केले आहे. तळघराचा वापर केवळ पार्किंग, स्टोरेज आणि कारलिफ्टसाठी करणे अपेक्षित होते. परंतु तेथे लायब्रेरी स्थापन करण्यात आली होती.