दुसऱ्या कसोटीतूनही कमिन्स बाहेर
वृत्तसंस्था / सिडनी
पाच सामन्यांच्या अॅशेस चषक कसोटी मालिकेतील दुसरा सामना ब्रिस्बेनमध्ये खेळविला जाणार असून या सामन्यातही ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला सहभागी होता येणार नाही. कमिन्सच्या गैरहजेरीत स्टिव्ह स्मिथकडे ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व राहील. या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी मिळविली आहे.
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने केवळ दोन दिवसांतच इंग्लंडचा धुरळा केला. पहिल्या कसोटीत इंग्लंड संघाला 8 गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला. आता या मालिकेतील दुसरी कसोटी ब्रिसबेनमध्ये 4 डिसेंबरपासून सुरू होणार असून ही कसोटी दिवसरात्रीची खेळविली जाणार आहे. मात्र कमिन्स ब्रिस्बेनला ऑस्ट्रेलियन संघाबरोबर जाणार आहे. या मालिकेतील 17 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत कमिन्स खेळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ऑस्ट्रेलियन संघ: स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), बोलॅन्ड, कॅरे, डॉगेट, ग्रीन, हेड, इंग्लीस, उस्मान ख्वाजा, लाबुशेन, लियॉन, नेसर, स्टार्क, विथरार्ड आणि वेबस्टर.