Satara News : साताऱ्यात 'सीट्रिपलआयटी' केंद्र मंजूर; युवकांना एआय आणि कौशल्य प्रशिक्षणाची संधी
साताऱ्यात एआय कौशल्य विकास केंद्र मंजूर
सातारा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून सातारा जिल्ह्यासाठी ११५ कोटी खर्चाचे 'सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्यूबेशन अँड ट्रेनिंग' अर्थात 'सीट्रिपल आयटी' केंद्र मंजूर झाले आहे. 'टाटा टेक्नॉलॉजी' कंपनीने केंद्र मंजुरीचे पत्र राज्य शासनाला पाठवले असून टाटा आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून सातारा येथे हे नवीन केंद्र लवकरच उभे राहणार आहे.
सातारा जिल्ह्यातीलयुवकांना उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक 'एआय' तंत्रज्ञानासहरोजगाराभिमुख कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र मंजुरीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी दोघांचेही आभार मानले आहेत.
सातारा येथे होणाऱ्या या 'सीट्रिपलआयटी' केंद्राच्या एकूण ११५ कोटींच्या खचपैिकी ९७कोटी ७५ लाख रुपये टाटा कंपनीतर्फे तर, १७ कोटी २५ लाख रुपये राज्य शासनाकडून उपलब्ध करण्यात येणार आहेत. साताऱ्यासाठी 'सीट्रीपलआयटी' केंद्र मंजूर करुन आणल्यामुळे जिल्ह्यातील युवकांना रोजगाराभिमुख अत्याधुनिक कौशल्यविकासाचे प्रशिक्षण मिळण्याचा तसेच जिल्ह्यामध्ये उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या 'सीट्रीपलआयटी' केंद्रामुळे सातारा जिल्ह्यातील युवकांना 'एआय' वापरासह जागतिक दर्जाचे आधुनिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगाराची संधी मिळणार आहे.
उद्योग क्षेत्राला स्थानिक पातळीवर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासह अनेक उद्दिष्टांची पूर्तता या 'सीट्रीपलआयटी' केंद्रामुळे होणार आहे. नागेवाडी, सातारा येथे आयटी पार्क उभारणीसाठी मंत्री मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा सुरु असून त्याची काही दिवसांपूर्वीच अधिसूचना काढण्यात आली होती. आता साताऱ्यासाठी नवीन सेंटर मंजूर झाल्याने जिल्ह्यातील युवकांसाठी मोठी उपलब्ध झाल्याचे मानले जात आहे.
तीन हजार युवकांना प्रशिक्षण
'टाटा टेक्नॉलॉजी' कंपनीने राज्य शासनाला पाठवलेल्या पत्रात, सातारा येथे राज्य शासनाच्या मदतीने ११५ कोटी रुपये खर्चुन नवीन 'सीट्रिपलआयटी' स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे कळवले आहे. टाटा टेक्नॉलॉ जी आणि राज्य शासन यासाठी निधी उपलब्ध करणार असून या नव्या सेंटरमधून दरवर्षी ३ हजार युवकांना प्रशिक्षित केले जाईल. त्यातून जिल्ह्यात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. हे सेंटर मंजूर केल्याबद्दल जिल्हावासियांमधून समाधान व्यक्त होत आहे.