‘सीएसके’चा आज पंजाब किंग्सशी मुकाबला
वृत्तसंस्था/ चेन्नई
प्ले-ऑफच्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्या असल्या, तरी चेन्नई सुपर किंग्स आज बुधवारी येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग सामन्यात चांगल्या स्थानावर असलेल्या, पण सातत्य नसलेल्या पंजाब किंग्सचा सामना करताना आपल्या निराशाजनक मोहिमेला बदलण्याचा प्रयत्न करतील. पाच वेळच्या विजेत्या सीएसकेसाठी हा हंगाम निराशाजनक राहिला आहे. नऊ सामन्यांतून फक्त दोन विजयांसह ते गुणतालिकेत तळाशी आहेत. दुसरीकडे, पंजाब नऊ सामन्यांतून पाच विजयांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे आणि निराश झालेल्या सीएसके संघाविऊद्ध विजय मिळवून ते वर येण्याचा प्रयत्न करतील.
सीएसकेसाठी सर्वांत निराशाजनक गोष्ट म्हणजे चेपॉकमधील घरच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना अपयश आले आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या धूसर आशा जिवंत ठेवण्यासाठी सीएसके स्पर्धेतील त्यांचा तिसरा विजय नोंदवण्यास उत्सुक असेल. कोपराच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या ऋतुराज गायकवाडकडून नेतृत्वाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महेंद्रसिंह धोनीसारखा तल्लख खेळाडूही संघाला उभारी देण्यात अपयशी ठरला आहे. आणि धोनीने कबूल केले आहे की, सीएसके योग्य संघरचना करण्याच्या बाबतीत संघर्ष करत आहे.
या सामन्यात आणखीही काही लढती रंगणार आहेत. सीएसकेचा तऊण खेळाडू आयुष म्हात्रे, ज्याने आयपीएल पदार्पणातच सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे, तो पॉवरप्लेमध्ये अर्शदीप सिंगचा सामना करताना जोरदार प्रदर्शन घडविण्याचा प्रयत्न करेल. मधल्या षटकांमध्ये शिवम दुबे आणि युजवेंद्र चहल यांच्यात रंजक लढत होण्याची अपेक्षा आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या भागात पंजाबचा चहल शानदार फॉर्ममध्ये आहे आणि सीएसकेची मधली फळी त्याला कशी हाताळते हे पाहावे लागेल. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग हे पंजाबसाठी फलंदाजीची सुऊवात करत असून ते चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदवर या दोघांना रोखण्याची जबाबदारी असेल.
कर्णधार श्रेयस लायरच्या रूपात पंजाबकडे एक असा फलंदाज आहे, जो खेळाचा वेग बदलू शकतो. दुसरीकडे, सीएसकेला अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज नूर अहमदवर अवलंबून राहावे लागेल. 43 वर्षांच्या धोनीने त्याच्या महान फिनिशिंग कौशल्याची झलक दाखवली आहे, परंतु एक हुशार रणनीतीज्ञ असूनही विजय मिळवून देणारी संघरचना साकारण्याच्या बाबतीत त्याला संघर्ष करावा लागलेला आहे. रचिन रवींद्र सलामीला सातत्य दाखवू शकलेला नाही आणि रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि मथीशा पाथिराना यांच्या संघर्षांनी सीएसकेच्या अडचणीत भर घातली आहे. फलंदाजीच्या आघाडीवर विजय शकर, दीपक हुडा आणि राहुल त्रिपाठी यांनीही अपेक्षाभंग केलेला आहे.
संघ: चेन्नई सुपर किंग्स-एम. एस. धोनी (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, डेव्हॉन कॉनवे, राहुल त्रिपाठी, शेख रशीद, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, आयुष म्हात्रे, रचिन रवींद्र, रविचंद्रन अश्विन, विजय शंकर, सॅम करन, अंशुल कंबोज, दीपक हुडा, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, खलील अहमद, नूर अहमद, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, श्रेयस गोपाल, मथीशा पाथिराना.
पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, वैशाख विजयकुमार, यश ठाकूर, हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, मार्को जॅनसेन, लॉकी फर्ग्युसन, जोश इंग्लिस, झेवियर बार्टलेट, कुलदीप सेन, पायला अविनाश, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, हरनूर पन्नू, एरोन हार्डी, प्रियांश आर्य, अजमतुल्ला ओमरझाई.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7:30 वा.