For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्रूझर पलटी, तीन प्रवासी गंभीर जखमी

09:57 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
क्रूझर पलटी  तीन प्रवासी गंभीर जखमी
Advertisement

येरगळ-मदार येथील घटना

Advertisement

विजापूर / वार्ताहर : येरगळ-मदार (ता. मुद्देबिहाळ) येथील बालाजी साखर कारखान्याकडे कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे क्रूझर वाहन पलटी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या अपघातात 3 प्रवासी गंभीर जखमी तर 14 जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. घटनेविषयी अधिक माहिती अशी, येथील बालाजी साखर कारखान्यातील कर्मचारी क्रूझरमधून जात होते. त्यावेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन पलटी झाले. त्यात अनिल वड्डर-मुद्देबिहाळ, मुदनाळ येथील विठ्ठल नावी, मुधोळ येथील मल्लिकार्जुन कुंभार यांना गंभीर दुखापत झाली आहे.अपघात झाल्याचे समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन खाजगी वाहनातून जखमींना तालुका शासकीय सार्वजनिक रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ.  परशुराम वड्डर यांच्या नेतृत्वाखाली उपचार करण्यात येत आहेत. या घटनेची नोंद मुद्देबिहाळ पोलीस स्थानकात झाली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.