For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीआरपीएफ जवान मणिपूरमध्ये हुतात्मा

06:43 AM Jul 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
सीआरपीएफ जवान मणिपूरमध्ये हुतात्मा
Advertisement

सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला, जिरीबाममध्ये कुकी दहशतवाद्यांकडून गोळीबार

Advertisement

वृत्तसंस्था / इंफाळ

मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यातील मोंगबांग गावात रविवारी सकाळी संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान हुतात्मा झाला. या हल्ल्यात तीन पोलीसही जखमी झाले आहेत. बिहारमधील 43 वषीय जवान अजय कुमार झा यांच्या डोक्मयात गोळी लागल्यानंतर ऊग्णालयात आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. जखमी पोलिसांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्मयाबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

मोंगबांग गावात रविवारी सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास संशयित कुकी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात सीआरपीएफ जवान अजय कुमार झा हुतात्मा झाले. या हल्ल्यानंतर आजूबाजूच्या डोंगराळ भागातून मोंगबँगमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. गोळीबारात सुरक्षा दलाच्या एका वाहनाचेही नुकसान झाले आहे.

13 जुलै रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेशी संबंधित शोध मोहिमेसाठी रविवारी सकाळी सीआरपीएफचे पथक रवाना होत असताना जिरीबाम जिल्हा पोलीस ठाण्यांतर्गत मोनबुंग गावाजवळ त्यांच्यावर हल्ला झाला. सीआरपीएफ आणि जिरीबाम जिल्हा पोलिसांच्या 20 बटालियनचे संयुक्त पथक एकाचवेळी मोहिमेत गुंतले होते. दरम्यान, दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

मुख्यमंत्र्यांकडून हल्ल्याचा निषेध

मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी हल्ल्याचा निषेध केला आणि जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, आज मी जिरीबाम जिह्यात सशस्त्र गटाने केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. हल्ला करणारा सशस्त्र गट कुकी समुदायाशी संबंधित असल्याचा संशय आहे. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानाचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे ते म्हणाले. मी हुतात्मा सैनिकाच्या शोकसंतप्त कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या प्रती लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असेही ते पुढे म्हणाले.

Advertisement
Tags :

.