2 वर्षीय बाळासोबत कावळ्याची मैत्री
माणूस आणि प्राण्यांमधील मैत्री नवी नाही. हजारो वर्षांपासून प्राणी अन् माणसांचे सहअस्तित्व राहिले आहे. परंतु माणूस आणि गाय, श्वान, मांजर एकत्र जगतात. पण कधी तुम्ही पक्षी आणि माणसाच्या मैत्रीबद्दल ऐकले आहे का? अलिकडेच एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात एक 2 वर्षीय मुलगा आणि कावळ्याची मैत्री दाखविण्यात आली आहे. हा कावळा या मुलासोबत सावलीप्रमाणे वावरत असतो. या व्हिडिओत 2 वर्षीय मुलगा आणि कावळा दिसून येत असून हे सर्वत्र एकत्रितपणे जात असतात.
कावळ्याचे नाव रसेल असून तो वनात राहणारा आहे. हा कावळा 2 वर्षीय ओटोचा मित्र आहे. कावळा ओटोसोबत घरात राहत नाही, परंतु ओटो बाहेर पडताच तो त्याच्यासोबत राहतो.ओटो हा कावळ्यासोबत खेळताना, फिरताना दिसून येतो. कावळा देखील त्याला घाबरत नाही तसेच त्याला नुकसानही पोहोचवत नाही. मुलगा घरात शिरताच कावळा खिडकीवर बसतो, ओटोने घराबाहेर पडत आपल्यासोबत खेळावे अशीच या कावळ्याची इच्छा असते. ओटो कारने कुठे जात असेल तर कावळा घराच्या छतावर बसून त्याची प्रतीक्षा करतो. दोघेही चांगले मित्र असले तरीही ओटोची आई स्वत:च्या मुलाला पक्ष्यासोबत एकटे सोडत नाही. या व्हिडिओला 82 लाख ह्यूज मिळाल्या आहेत.