महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भोगीसह संक्रातीच्या साहित्य खरेदीला गर्दी

01:00 PM Jan 12, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

मकर संक्रांतीच्या सणासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या असून खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी आहे. सुगड, तीळ-गूळ, रेवडी, कांदापात, वांगी, घेवडा, वाटाण्याच्या शेंगा, ऊस, मेथी, भांडी, सौभाग्य लेणी यांसह अन्य वस्तू बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. लक्ष्मीपुरी, पापाची तिकट, शिंगोशी मार्केट, शहरातील सर्व भाजी मंडईसह रस्त्याच्या कडेला खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी आहे. ववसा म्हणून देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंनाही मोठी मागणी आहे. भोगी आणि मकर संक्रातीसाठी लागणाऱ्या सर्वच साहित्यांच्या दरातही वाढ झाली आहे.

Advertisement

बाजारात संक्रांतीचा ववसा पुजण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि हळदी-कुंकू कार्यक्रमांसाठी नवनवीन वस्तूंना प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. वाण खरेदीला चांगला महिलांचा प्रतिसाद मिळत आहे. हळदी-कुंकवाला आलेल्या महिलांना अनोखे वाण देण्याची तयारी सुरू असल्याने बाजारपेठा सध्य सजल्या आहेत. मकरसंक्रांतीला जुनी परंपरा जपण्यासाठी लोक मोठ्या उत्साहाने खरेदी करत आहेत. लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, महापालिका परिसर, राजारामपुरी, शिंगोशी मार्केट, महाव्दार रोड, आदी ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी आहे. रस्त्याच्या कडेला बाजरी, राळ, गुळ, बाजरीचे पीठ, बिबा फुल, तीळ , सुगड, काळ्या साड्या आदी वस्तूंची विक्री सुरू आहे. काही घरात लहान बाळांच्या बोरन्हानची तयारीदेखील सुरू केली आहे. त्यासाठी लागणारे साखरेचे तीळ, बोर, माळा, बाळाला नटवण्यासाठीचे साहित्य खरेदीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भोगीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या, बाजरी, बाजरीचे पीठ, राळ, वांगी, मेथी, गाजर, कांदापात खरेदीला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

वस्तू                            किलोमागे दर

तीळ                               200

गुळ                                60

रेवडी                             200

तीळाचे लाडू व वडी            240

साखरेचे तिळगुळ               70

गाजर                            100

वांगी                              80

घेवडा                            80

वाटाणा                          100

बोर                               40

मेथी                               20

चाकवत                          20

ऊस कांडी                      15

कोथींबीर                        10

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article