महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रावण शुक्रवारसाठी बाजारात गर्दी

11:08 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गणेशोत्सव तोंडावर, खरेदीची लगबग

Advertisement

बेळगाव : श्रावण शुक्रवारनिमित्त बाजारात गुरुवारी खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी झाली होती. विशेषत: गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, खडेबाजार आदी ठिकाणी खरेदीची लगबग पाहावयास मिळाली. त्याबरोबरच गणेशोत्सव तोंडावर आल्याने गणरायांच्या तयारीसाठी बाजारात वर्दळ वाढू लागली आहे. शेवटच्या शुक्रवारनिमित्त बाजारात पूजेच्या साहित्याला अधिक मागणी वाढली होती. विशेषत: हार, फुले आणि फळांची खरेदीही अधिक प्रमाणात झाली. त्याबरोबरच केळीची पाने आणि इतर पूजेच्या साहित्याची मागणी अधिक होती. येणारा सोमवार हा शेवटचा श्रावण सोमवार व अमावास्या असल्याने या पार्श्वभूमीवर ही खरेदी होऊ लागली आहे. श्रावण मासानिमित्त विविध मंदिरांतून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याबरोबरच विविध ठिकाणी पूजा-अर्चा इतर कार्यक्रमही होऊ लागले आहेत. त्यामुळे बाजारात पूजेचे साहित्य आणि फळा-फुलांची आवक वाढू लागली आहे. त्याबरोबरच गणेशोत्सव तोंडावर आल्याने गणरायाच्या स्वागतासाठी लागणाऱ्या साहित्यांनी बाजारपेठ बहरू लागली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article