For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निलगारच्या दर्शनासाठी प्रवाशांची गर्दी

11:20 AM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
निलगारच्या दर्शनासाठी प्रवाशांची गर्दी
Advertisement

बेळगाव-संकेश्वर बसला महिला प्रवाशांची संख्या अधिक

Advertisement

बेळगाव : संकेश्वर येथील निलगार गणरायाच्या दर्शनासाठी बेळगाव परिसरातूनही भक्तगण संकेश्वरला जात आहेत. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकात बेळगाव-कोल्हापूर बससेवेवर भक्तांचा अतिरिक्त ताण वाढला आहे. निलगार गणरायाच्या दर्शनासाठी बेळगाव बसस्थानकातही प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. यामध्ये महिला प्रवाशांची संख्या अधिक आहे.शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. या योजनेचा लाभ घेत संकेश्वरकडे जाणाऱ्या महिला भक्तांची संख्या वाढली आहे. निलगारचा गणपती 21 दिवस विराजमान होतो.

शिवाय नवसाला पावणारा गणराय म्हणून ख्याती आहे. त्यामुळे दरवर्षी निलगार बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी होते. गतवर्षीपासून शक्ती योजना सुरू झाली आहे. त्यामुळे महिला अधिक संख्येने निलगार बाप्पांच्या दर्शनासाठी जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे बेळगाव-संकेश्वर मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. मागील चार दशकांपासून संकेश्वर येथील राजा निलगार गणरायाचा महिमा वाढला आहे. दरवर्षी भेट देणाऱ्या भक्तांची संख्या वाढू लागली आहे. बेळगावसह खानापूर, सौंदत्ती, कित्तूर यासह महाराष्ट्रातूनही भक्तगण गर्दी करू लागले आहेत. 21 दिवस गणराय विराजमान होत असल्याने बेळगाव आणि परिसरातूनही निलगारच्या दर्शनासाठी भाविकांची वर्दळ वाढू लागली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.