For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नंदगड धरणावर वर्षा पर्यटकांची गर्दी

10:48 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
नंदगड धरणावर वर्षा पर्यटकांची गर्दी
Advertisement

धरणाच्या दुऊस्तीबाबत लघुपाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष : परिसरातील रस्तेही झाले खराब

Advertisement

वार्ताहर/हलशी

नंदगड गावच्या पश्चिमेस असलेल्या धरण सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे तुडुंब भरले आहे. त्यामुळे धरणाच्या पारावरून पाणी वाहू लागले असून या विहंगम दृश्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. धरणाचे मुख्य कालवे, पोटकालवे पूर्णपणे नादुऊस्त झाल्यामुळे तसेच पाण्याचा पुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आलेले कालवेही पूणपणे गाळाने भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा उपयोग होत नाही. वारंवार मागणी करूनदेखील या धरणाच्या दुऊस्तीबाबत लघुपाटबंधारे खात्याकडून काहीही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. या धरणातून ऑक्टोबरनंतर शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात येते. पण या ठिकाणी कोणीही कर्मचारी तैनात नसल्याने धरणाची देखभाल होत नाही. या धरणातून नंदगड गावाला पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी पाईपलाईन घालण्यात आली आहे. मात्र ती पाईपलाईन नादुऊस्त झाल्याने या धरणातून गेल्या काही वर्षापासून पाणीपुरवठा बंद आहे.

Advertisement

यात्रेपूर्वी पाईपलाईन दुरुस्त करा

2025 साली महालक्ष्मी यात्रा भरवण्यात येणार आहे. त्यापूर्वी पाणीपुरवठा करण्यात येणारी पाईपलाईन दुऊस्त करून घेण्यात यावी, यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. तसेच धरणाच्या आजूबाजूला ऐतिहासिक कदंबकालीन श्री तट्टेश्र्वर मंदिर व आनंदगड किल्ला येथील जागृत श्री दुर्गादेवी मंदिर आहे. तेथे जाण्यासाठी या धरणाच्या परिसरातून रस्ता आहे. पावसामुळे वाहनांची वर्दळ असल्याकारणाने चिखल, खड्डे निर्माण होऊन रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे नवरात्रोत्सव व दुर्गादेवी तसेच श्रावण महिना व महाशिवरात्र श्री तट्टेश्वर दर्शनाला जाण्यासाठी भाविकांची गैरसोय होत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.