धामणे परिसरात गणेश दर्शनासाठी भाविकांची गर्दी : अनेक मंडळांतर्फे महाप्रसाद वितरण
वार्ताहर/धामणे
ग्रामीण भागात बेळगाव शहराप्रमाणे गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असून धामणे, सुळगे (ये.), देसूर, नंदिहळ्ळी, राजहंसगड, नागेनहट्टी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्यावतीने रविवारपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार व मंगळवारपर्यंत अनेक मंडळांनी महाप्रसादाचे वाटप केले. प्रत्येक मंडळाच्यावतीने श्रींच्या सत्यनारायण देवाचे पूजन भक्तीभावाने आयोजन करण्यात येत आहे. शहराप्रमाणे प्रत्येक गावात संध्याकाळी 7 नंतर रात्री उशीरापर्यंत गणेशभक्तांची गर्दी होत आहे.
धामणे येथे शिवशक्ती गणेशोत्सव मंडळ, बसवाण गल्ली यांच्यावतीने सतत चार दिवस रात्री 8 ते 10 महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पाटील गल्ली यांच्यावतीने, शिवशंभू गणेशोत्सव मंडळ यांच्यावतीने सोमवारी महाप्रसादाचे वाटप झाले. त्याचप्रमाणे देसूर येथील बालशिवाजी गणेशोत्सव पोटे गल्ली व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लक्ष्मी गल्ली यांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप झाले. नंदिहळ्ळी येथील महालक्ष्मी चौकातील गणेशोत्सव मंडळातर्फे महाप्रसादाचे वाटप झाले. पावसाची रिमझीम सुरू असली तरीही ग्रामीण भागात गणेशोत्सव भक्तीमय आणि उत्साही वातावरणात सुरू आहे.