कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

थिएटरवर मराठी चित्रपटांची गर्दी

05:34 PM Sep 19, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सांगली / सचिन ठाणेकर :

Advertisement

मराठी चित्रपटसृष्टी सध्या वैविध्यपूर्ण विषयांनी बहरली असून सांगलीतही एकाचवेळी अनेक चित्रपट प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांची पावले थिएटकरकडे वळत आहेत. कोकण पार्श्वभूमीवरील दशावतार, तरुणाईची प्रेमकथा मांडणारा आरपार आणि विनोदी अंगाने नातेसंबंध उलगडणारा बिन लग्नाची गोष्ट हे तीन वेगळ्या ढंगाचे चित्रपट एकाचवेळी प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. तर येत्या शुक्रवारी कुर्ला टू वेंगुर्ला, साबरबोंडं हे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तसेच सांगलीकर कलाकरांचा झिंग हा चित्रपटाचाही समावेश आहे.

Advertisement

नुकताच प्रदर्शित झालेल्या दशावतार या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे. या चित्रपटाने मराठी रसिकांची पावले पुन्हा थिएटरकडे वळवली आहेत. कोकणातील दशावतारी नाटकाची समृद्ध परंपरा यातून उलगडली आहे. बाबुली मेरत्रीची भूमिका साकारणारे दिलीप प्रभावळकरसह तरुण कलाकार सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शनी इंदलकर, अभिनय बेर्डे, तसेच महेश मांजरेकर, भारत जाधव, रवि काळे यासारखे दिग्गज कलाकार चित्रपटात झळकले आहेत.

ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे संगीत आणि गुरु ठाकूर यांची गाणी या चित्रपटाला लोकधाटणीचा रंग भरतात. देवेंद्र गोलतकर यांचे छायाचित्रण आणि फैझल महाडिक यांचे संपादन फिल्मला सिनेमॅटिक उंची देतात. परंपरा, श्रद्धा आणि कलाकारांचा संघर्ष या त्रिसूत्रीवर आधारित हा सिनेमा सांस्कृतिक वारसा जपत मनोरंजन करतो.

युवावर्गाला समोर ठेवून बनवलेला आरपार हा गौरव पाटकी दिग्दर्शित सिनेमा कॉलेज जीवनातील प्रेम आणि जबाबदाऱ्या यांची कहाणी सांगतो. ललित प्रभाकर आणि हुता दुर्गुळे ही लोकप्रिय जोडी या चित्रपटाची प्रमुख आकर्षण आहे. त्यांच्यासोबत माधव अभ्यंकर, सुहिता थत्ते आणि स्नेहलता वसईकर यांच्या भूमिका आहेत. नामदेव काटकर आणि ऋतेश चौधरी निर्मितीत या चित्रपटाचे संगीत गुलराज सिंग यांनी दिले असून आधुनिक, रोमॅटिक गाणी तरुणाईला भावणारी आहेत.

या दोन्ही चित्रपटांसोबतच बिन लग्नाची गोष्ट हा विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. लग्नाचा विषय नेहमीच मराठी सृष्टीत आकर्षणाचा ठरला आहे. यामध्येही विवाहसंस्थेबद्दल तरुणांचा दृष्टिकोन, कौटुंबिक दबाव व त्यातून निर्माण होणाऱ्या गंमतीदार परिस्थिती दाखवल्या आहेत. सध्याची लग्न करण्याची प्रवृत्ती आणि त्यावरून होणारी घरातील चर्चा, वादविवाद हे सारे मुद्दे विनोदी शैलीत मांडले आहेत.

येत्या आठवड्यातही साबरबोंडं, बहुचर्चित कुर्ला टू वेंगुर्ला व सांगलीकरांचा झिंग प्रदर्शित होत आहे. बहुचर्चित कुर्ला टू वेंगुर्ला हा विजय कलमकर दिग्दर्शित चित्रपट मुंबईच्या कुर्त्यातून कोकणातील वेंगुर्ल्यापर्यंतच्या प्रवासावर आधारीत आहे. शहरातील आधुनिक जीवनशैली आणि कोकणातील साधेपणा यातील संघर्ष या कथेतून दिसतो. विना जामकर, वैभव मांगले, प्रल्हाद कुडतारकर, रवानंदी टीकेकर, अमेय परब या कलाकारांच्या भूमिका प्रवासाला रंगत आणतात कथानक, पटकथा व संवाद अमरजीत अमळे यांचे असून अक्षय खोत यांच्या सुरांनी चंचल काले यांच्या गीतांनी रंग भरला आहे.

सांगलीत अनेक मराठी चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाल्याने चित्रपटगृहांकडे प्रेक्षकांना खेचून आणण्यात यश आले आहे. प्रेक्षकांसाठी हा काळ म्हणजे सिनेमांचा सोहळा ठरला असून प्रत्येकाने आपल्या आवडीच्या ढंगातला सिनेमा निवडण्याची संधी मिळाली आहे. सांगलीकरांसाठी या दिवसांत मराठी चित्रपटांची खरी मेजवानी रंगली आहे

सांगलीतील कलाकारांची भाऊगर्दी असलेला झिंग' चित्रपटही आज प्रदर्शित होतोय सांगलीचाच असलेला सौरभ कुंभार हा निर्माता व नायकही आहे. तसेच यशोधन गडकरी, शुभम चौधरी, मोहन राऊत, सोमनाथ पाटील, सेजल शहा, दिग्विजय वराळे, आकाश शिंदे, रत्नेशा पोतदार, महादेव केदार हे कलाकार सांगलीचे आहेत. तर सांगलीच्याच प्रताप जोशीने छायाचित्रण केले आहे. यात साताऱ्याची तेजल शिंदे, अभिनेते शशांक शेंडे, रोहित चव्हाण, संतोष शिंदे यांच्याही भूमिका आहेत. दिग्दर्शन अमित कोळी यांचे व सहायक दिग्दर्शन अक्षय मोरे यांचे आहे. 'ड्रीम लालटन प्रोडक्शन्स' आणि 'रेडब्रिक्स मोशन पिक्चर' प्रस्तुत, दिपक पेटकर व सौरभ कुंभारची निर्मिती आहे. पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत व प्रसिद्ध लावणीकिंग आशिष पाटील यांचे नृत्य दिग्दर्शन आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article