वसंतदादा शेतकरी बँकेमुळे बाजार समितीला ३ कोटींचा खड्डा
सन 2001-02 पासूनच्या दुय्यम आवार आणि कर्मचारी फंडाच्या ठेवी अडकल्या
सांगली प्रतिनिधी
अवसायनात निघालेल्या येथील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचेही सुमारे तीन कोटी इतकी रक्कम अडकली आहे. सन 2001- 02 पासून च्या दुय्यम आवारचे दीड कोटी तर कर्मचारी फंडाचे सुमारे 60 लाख रूपये इतक्या रकमेचा समावेश आहे. बँक बंद पडल्याने ही रक्कम कशी मिळणार असा प्रश्न बाजार समितीला पडला आहे.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीला सेस व अन्य मार्गाने कोट्यावधी रूपयांची रक्कम जमा होते. त्यातील काही रक्कम सोयी सुविधांसाठी तर उर्वरित रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेसह सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ठेवली जाते, अशाच पद्धतीने सन 2001-02 मध्ये तत्कालीन सभापती सुभाष खोत यांच्या कार्यकालात बाजार समितीने कवठेमंकाळ, मिरज आणि विष्णू अण्णा फळ मार्केट या दुय्यम आवर समित्यांमधील सुमारे दीड कोटी ऊपये ठेवी स्वरूपात ठेवले होते, यशिवाय समितीच्या कर्मचारी फंडाची सुमारे एक कोटी ऊपयांची ठेव असे अडीच कोटी ऊपयांच्या ठेवी वसंतदादा सहकारी बँकेत ठेवल्या होत्या. मात्र सन 2009 पासून आर्थिक अडचणीत येऊन बंद पडली नंतर बाजार सा†मतीने ठेवलेल्या ठेवी मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र ही रक्कम मिळाली नाही.
कालांतराने वसंतदादा बँक अवसायनात निघाली. त्यानंतर अवसायकांनी बँकेत अडकलेल्या ठेवींच्या रकमा देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये बाजार समितीच्या प्रती कर्मचाऱ्यांना एक लाख रूपये प्रामाणे चाळीस लाख रूपये एवढी रक्कम दिली. मात्र बाजार समितीच्या ठेवी कर्मचारी फंडाची उर्वरित रक्कम अद्याप मिळालेली नाही. व्याजासह या रक्कमेत वाढ झाली आहे. कोटयवधी रूपये अडकलेली रक्कम कशी आणि कधी मिळणार या चिंतेत बाजार समिती आणि कर्मचारी आहेत.