सैनिक टाकळीतील पिके कित्येक दिवस महापुराच्या पाण्याखाली
सैनिक टाकळी प्रतिनिधी
धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे असल्यामुळे कोयना,चांदोली, राधानगरी काळम्मावाडी या धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे काळम्मावाडी धरणातून पाणी सोडल्यामुळे दूधगंगा नदी पात्रा बाहेर वाहत असून ती नदी सैनिक टाकळी आणि दानवाड जवळ कृष्णा नदीला मिळते त्यामुळे या पाण्याचा फुगवटा सैनिक टाकळी येथे येतो चांदोली धरणाचे पाणी वारणा नदीतून सांगली जवळ कृष्णा नदीला मिळते आणि राधानगरी धरणाचे पाणी पंचगंगेतून नरसिंहवाडी येथे कृष्णा नदीला मिळते त्यामुळे या शिरोळ तालुक्यातील बस्तवाड, अकिवाट,राजापूर,खिद्रापूर, राजापूरवाडी,सैनिक टाकळी आणि जुने दानवाड या गावांना या महापुराचा सामना करावा लागतो.
या गावातील नागरिकांनी आपली जनावरे प्रापंचिक साहित्य आपल्या स्वखर्चाने स्थलांतरित केले आहेत परंतु या महापुरात जनावरांची गोठे काही राहते घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे त्याचबरोबर जवळजवळ सात ते आठ दिवसापासून भुईमूग सोयाबीन आणि आता केलेली लागन आणि चालू हंगामात जाणारे ऊस पीक कुजत आहेत.
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे थोडा पूर ओसरत होता पाऊस पुन्हा सुरू झाल्यामुळे आणि धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे पुराचे पाणी पुन्हा वाढत आहे त्यामुळे येथील नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सैनिक टाकळी हे नदीपासून लांब असल्यामुळे तेथील राहत्या वस्तीला अद्याप तरी धोका नाही परंतु शेतीचे मोठे नुकसान सैनिक टाकळीतील शेतकऱ्यांचे होते त्यामुळे बुडालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई सानुग्रह अनुदान मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होत आहे