Solapur : जुनोनी येथे पायोनियरच्यावतीने पीक मळणी, शेती नियोजन शेतकरी मेळावा
जुनोनीत शेत नियोजन व मका लागवडीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन
मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील जुनोनी येथे पायोनियर सिड्स कंपनीच्या पी ३३०२ या मका पिकाचा माजी विस्तार अधिकारी सुखदेव सौदागर यांच्या शेतामध्ये पीक मळणी कार्यक्रम व शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना शेताचे व पिकाचे नियोजन कशा पद्धतीने करावे याचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या व शेतकरी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच पी ३३०२ या वाणाचे वैशिष्ट्य व मका पिकाचे उत्पन्न वाढण्यासाठीचे कशा पद्धतीचे नियोजन पाणी खताचे होस व किडीपासून बचाव असे अनेक उपाय योजना व अधुनिक तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जुनोनीचे सरपंच दत्तात्रय माने, किशोर जाधव, सुखदेव सौदागर, शेतकरी बांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमास पायोनियर कंपनीचे अधिकृत विक्रेते, टेरीटेरी मॅनेजर तुषार साळुंखे व कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते.