महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पिकांची हानी मोठ्या प्रमाणात; भरपाई मात्र मोजक्याच शेतकऱ्यांना

11:21 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बळ्ळारी नाला परिसराबरोबरच इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतून संताप

Advertisement

बेळगाव : पावसामुळे नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली पाहिजे. मात्र केवळ बळ्ळारी नाल्याला लागून असलेल्या सर्व्हे क्रमांकमधील शेतकऱ्यांनाच नुकसानभरपाई दिली जात आहे. बळ्ळारी नाल्यामुळे इतर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असताना त्यांना मात्र नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असून पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. बळ्ळारी नाला, लेंडी नाला व इतर नाल्याच्या परिसरातील शिवाराचे पावसामुळे नुकसान झाले आहे. याचबरोबर पाणथळ शिवारालाही पावसाचा फटका बसून भात पीक कुजून गेले आहे. केवळ बळ्ळारी नाला परिसरच नाही. इतर परिसरातील शिवारातही पाणी साचून भात पिकाचे नुकसान झाले आहे. मात्र त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देता येणार नाही, असे तहसीलदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सांगत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रिकाम्या हाती घरी परतावे लागत आहे.

Advertisement

दरवर्षी बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान होतच असते. यावर्षी अधिक पावसामुळे इतर भागातीलही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या सर्वांनाच नुकसानभरपाई दिली पाहिजे. वास्तविक योग्य प्रकारे पावसाळ्यात सर्व्हे होणे गरजेचे होते. मात्र अधिकाऱ्यांनी सर्व्हेच केला नाही. त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, हे समजणे अवघड झाले आहे. बळ्ळारी नाल्याला लागून असलेल्या परिसरालाच पुराचा फटका बसला आहे. मात्र काही मोजक्याच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. इतर शेतकरी कागदपत्रे जमा करण्यासाठी गेले असता त्यांची कागदपत्रे स्वीकारण्यास नकार दिला आहे. यामुळे नुकसान होऊनही नुकसानभरपाई मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, संपूर्ण सर्व्हे करावा त्यानंतरच सर्वच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांची कागदपत्रे प्रथम जमा करून घ्यावीत आणि त्यांना नुकसानभरपाई द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article