For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पीकहानीची भरपाई आठवडाभरात

06:08 AM Aug 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
पीकहानीची भरपाई आठवडाभरात
Advertisement

महसूलमंत्री कृष्णभैरेगौडा यांची माहिती : पावसामुळे 80 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

पावसामुळे राज्यात 80,000 हेक्टरमधील पीकहानी झाली आहे. त्यामुळे  नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना आठवडाभरात नुकसान भरपाई दिली जाईल, अशी माहिती महसूलमंत्री कृष्णभैरेगौडा यांनी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. राज्यात 78,679 हेक्टरवरील शेती पिकांचे आणि 2294 हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. आठवडाभरात कोणत्या पिकांचे नुकसान झाले याची ठोस माहिती उपलब्ध होईल. त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरण सुरू करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या उपलब्ध निधीतून भरपाई दिली जाईल.

Advertisement

आणखी दीड महिना पाऊस पडण्याची शक्यता असल्याने आगामी काळात पिकांचे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्याचा पूर्ण कालावधी संपल्यानंतर केंद्र सरकारकडे मदतनिधीसाठी विनंती करण्यात येईल, असे ते म्हणाले. यावर्षी पिकांच्या नुकसानीचे प्रमाण आटोक्यात आले आहे. 2020 मध्ये 2.21 लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते 2021 मध्ये 2.12 लाख हेक्टर आणि 2022 मध्ये 1.53 हेक्टरमधील पिकांची हानी झाली होती. मात्र, मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा 80 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाळ्याचा अजून दीड महिना बाकी असल्याने हा प्रश्न अतिशय काळजीपूर्वक आणि जबाबदारीने हाताळला जाईल, असे मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी सांगितले.

आतापर्यंत किती नुकसान?

यंदाच्या पावसाळ्यात 1,126 घरे पूर्णपणे कोसळली आहेत तर अनधिकृतपणे बांधलेली 75 घरेही कोसळली आहेत. याशिवाय 1,176 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून 2,338 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. एकूण 8,000 घरांचे नुकसान झाले. आमचे सरकार उदार असून घरांचे नुकसान झालेल्या सर्वांना भरपाई दिली जात आहे, असे त्यांनी सांगितले. घराचे पूर्णपणे नुकसान झाल्यास सरकारकडून 1,20,000 ऊपयांसह एक घर बांधून दिले जात आहे. या कामासाठी आतापर्यंत एकूण 9.21 कोटी ऊपये देण्यात  आले आहेत. पाणी शिरून घरांचे नुकसान झाल्याने 2,800 घरांच्या दुऊस्तीसाठी 70 लाखांची मदत देण्यात आली आहे. दैनंदिन वापराच्या वस्तूंसाठी 70 लाखांची भरपाई असे एकूण 1.40 कोटी ऊपयांची भरपाई देण्यात आली आहे. तसेच अनधिकृत घरांचे नुकसान झाल्यास त्यांना 1 लाख ऊपयांपर्यंतची भरपाईही देण्यात आली आहे. घराचे अंशत: नुकसान झाल्यास एसडीआरएफ नियमांनुसार केवळ 2,500 ऊपये नुकसान भरपाई म्हणून दिले जाऊ शकते. मात्र, राज्य सरकारने 50 हजारांपर्यंतची भरपाई दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आवश्यकता भासली तर आणखी निधी

राज्यभरात पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये 151 मोठी आणि 137 लहान जनावरे मृत झाली आहेत. त्यामुळे संबंधितांना 52.98 लाख ऊपयांची भरपाईही देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पीडी खात्यात 667 कोटी ऊपये असून मदतकार्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे. गरज पडल्यास राज्य सरकार  आणखी निधी देण्यास तयार असल्याची माहिती मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी दिली.

Advertisement
Tags :

.