बेळगावला आज ‘यलो अलर्ट’
12:05 PM Aug 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात शनिवारी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कर्नाटक किनारपट्टीवर, मलनाड आणि दक्षिण कर्नाटक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंगळूर आणि उडुपी जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. तर कारवार, चिक्कमंगळूर, हासन, शिमोगा जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ आणि बेळगाव, कलबुर्गी, बिदर जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
Advertisement
Advertisement