Sangli : सांगलीत पीक नुकसान, विम्याचे साडेदहा कोटीवर भरपाई जमा
सात हजारावर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग होणार
सांगली : पीक नुकसान भरपाई व पंतप्रधान पीक बीमा योजनेचे १० कोटी ६५ लाख रुपयांचे अनुदान जिल्हा बँकेत जमा झाले आहे. सदरची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येत असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव बाघ यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भारपाई शासनाने शेतक्रयांच्या बैंक खात्यावर वर्ग केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
मात्र अद्याप ही मदत शेतकऱ्यांना मिळाली नसल्याच्या तक्रारी येत आहेत. दरम्यना जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकयांच्या यापुर्वीच्या पीक नुकसान भरपाईचे ५ कोटी ९५ लाख रुपये शासनाकडून जमा झाले आहे. ही रक्कम ६ हजार व २०७ लाभार्थी शेतकयांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. तसेच या शिवाय जिल्हा बँकेत पंतप्रधान पीक विमा याजेनेचे ४ कोटी ७० लाख रुपये जमा झाले आहेत. ही रक्कम १ हजार ४९ लाभार्थी शेतक्रयांसाठी आहे. या दोन्ही रक्कम संबधीत लाभार्थी शेतकयांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.
दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुमारे दीड लाख लाखावर हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे याची सुमारे दीडशे कोटी रुपये नुकसान भरपाई रक्कम जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहे मात्र संबंधित शेतक्रयांच्या खात्यावर ही रक्कम अद्याप जमा झाली नसल्याने शेतक्रयातून नाराजी व्यक्त होत असतानाच पीक नुकसान भरपाई व पंतप्रधान पिक विमा चे पैसे मिळणार असल्याने शेतक्रयातून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.