For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चर्चमध्ये 500 वर्षांपासून टांगलेला मगरीचा मृतदेह

06:35 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
चर्चमध्ये 500 वर्षांपासून टांगलेला मगरीचा मृतदेह
Advertisement

यामागे आहे अनोखी कहाणी

Advertisement

जगात अनेक जागा अजब कारणांसाठी ओळखल्या जातात, याचपैकी एक आहे इटलीतील विशेष चर्च, याची कहाणीच वेगळी आहे. सर्वसाधारणपणे जेव्हा तुम्ही चर्चमध्ये नजर फिरविता तेव्हा जुनी स्थापत्यकला पहायला मिळते, परंतु या चर्चच्या छतावर सुमारे 500 वर्षांपासून एक मृतदेह टांगलेला आहे. परंतु हा मृतदेह मानवी असून मगरीचा आहे.

इटलीच्या लोम्बार्डिया क्षेत्रात सँटुआरियो डेला बीटा वेर्गिन मारिया डेले ग्राजी एक जुने चर्च असून ते स्वत:च्या छतावर लटकलेल्या मगरीसाठी प्रसिद्ध आहे. सँटुआरियो डेला बीटा वर्जिन मारियो डेले ग्राजीमध्ये ही मगर कशी जखमी झाली आणि याचे रहस्य कायम राहणार आहे, परंतु याचा उद्देश धार्मिक प्रतीकवादाशी जोडलेला होता.

Advertisement

प्राचीन काळात ख्रिश्चन धर्म साप, ड्रॅगन आणि मगरीला वाईट शक्तींशी जोडायचा, किंवा सैतानाच्या स्वरुपात किंवा अशा प्राण्यांच्या स्वरुपात जे मनुष्यांना पापाच्या दिशेने नेतात. याचमुळे या चर्चमध्ये वर साखळदंडांमध्ये मगरीचा मृतदेह बांधून चर्चमध्ये येणाऱ्या लोकांना वाईट शक्तीवर चांगल्या शक्तींच्या विजयाचे प्रतीक म्हणून संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

परंतु एका नजरेत एक प्रॉपसारखे दिसून येते, प्रत्यक्षात ही एक नील मगर (क्रोकोडिलस निलोटिकस) आहे, जी कमीतकमी 500 वर्षे जुनी मानली जाते. हे चर्च 13 व्या शतकातील आहे. वर्षांपासून प्राण्यांच्या उत्पत्तीविषयी अनेक वंदता लोम्बार्डियाच्या आसपास प्रसारित झाल्या आहेत, परंतु दोन सर्वात लोकप्रिय कहाण्यांपैकी एक स्थानिक प्राणी संग्रहालय आणि प्राण्यांशी लढणाऱ्या दोन शूर भावांची कहाणी सामील आहे.

फ्रान्सेस्को गोजागामध्ये एका खासगी विदेशी प्राणीसंग्रहालयातून पळालेल्या मगरीला पकडण्यात आले होते आणि मारून टाकण्यात आले होते असे काही लोकांचे मानणे आहे. तर प्राण्याने एकेदिवशी मिनसियो नदीच्या काठावर आराम करत असलेल्या दोन भावांवर हल्ला केला होता, यातील एका भावाने पवित्र वर्जिन नदीकडून मदत मागितली आणि चाकूने हल्ला करत या मगरीला मारून टाकल्याचे  इतर लोकांचा दावा आहे.

या कहाण्यांवर विश्वास अनेकांचा विश्वास नसला तरीही सँटुआरियो डेला बीटा वर्जिन मारिया डेले ग्राजीतील लटकलेली मगर आकर्षणाचे केंद्र आहे. इटलीतील मॅकेराटामध्ये सांता मारिया डेले वेर्गिनी चर्च आणि पोंटे नोसामध्ये सँटुआरियो डेला मॅडोना डेले लैक्राइममध्ये देखील अशाचप्रकारे मगरीचे मृतदेह लटकलेले आहेत.

Advertisement
Tags :

.