For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आग लावून राजकीय पोळी भाजून घ्यायची हे ठाकरे कुटुंबीयांचे नाटकी हिंदुत्व !

05:04 PM May 04, 2024 IST | अनुजा कुडतरकर
आग लावून राजकीय पोळी भाजून घ्यायची हे ठाकरे कुटुंबीयांचे नाटकी हिंदुत्व
Advertisement

मंत्री दीपक केसरकारांचे टीकास्त्र

Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना काहीच करत नाही. ते फक्त आग लावायची आणि स्वतः ची पोळी भाजून घेण्याचा उद्योग करत आहे. जे काजू बागायतदार शेतकरी यांचा फलक लावण्यात आलेले आहेत तो उबाठा शिवसेनेचा उद्योग आहे. असे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

Advertisement

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे आहेत. ते एकट्या कुणाचे नाही असा टोला उद्धव ठाकरे यांना केसरकर यांना लगावला. ते म्हणाले,अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांनी कोकण,महाराष्ट्रासाठी काही केले नाही. कोविड काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस फुकट पाठविली. जनतेला मोफत धान्य वाटप केले. ठाकरे यांनी काहीही केले नाही.केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणबुडी प्रकल्प मंजूर केला. त्यासाठी मुख्यमंत्री व पर्यटन मंत्री असताना पिता पुत्राने अडीच वर्षात काही केले नाही. पाणबुडी नव्हे तर कुठलाही प्रकल्प गुजरातला नेला नाही. सत्तेच्या काळात अडीच वर्षात काहीही त्यांनी केले नाही. त्यामुळे खोटे नाटे आरोप करत आहेत.देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी काल रत्नागिरी येथील भेटीत भारतात येणारा सर्वात मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार आहे असे म्हटले आहे.

आफ्रिकेत जाऊन प्रचार करा असा फलक काजू बागायतदार यांनी लावला आहे . यावर बोलताना केसरकर म्हणाले, तो फलक उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने लावला आहे. ही मंडळी फक्त आग लावण्याचा प्रयत्न करत असतात. आग लावायची आणि स्वतः ची पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करत आहेत. उलट काजू बागायतदार शेतकरी आणि बागायतदार संघाचे प्रतिनिधी यांची आणि कारखानदार यांच्यात समन्वय घडवून आणला आणि काजू दराबाबत निश्चिती केली. तसेच काजू बी प्रतिकिलो अनुदान १० रूपये दिले जाईल असे सांगितले. मात्र आचारसंहितेमुळे ते निवडणूकीत नंतर होईल. याबाबत काजू बागायतदार शेतकरी समाधानी आहेत.

केसरकर म्हणाले, आचारसंहितेनंतर काजू बी धोरण स्वीकारले जाणार आहे. काजू बोर्ड स्थापन करून पुढील वर्षी काजू खरेदीला प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. जनतेसोबत आम्ही आहोत, त्यामुळे उबाठा वाले फक्त आग लावायचा धंदा करत आहेत. आम्हाला तुम्ही खोके गद्दार म्हणून हिणवता आम्ही विचार बदलण्यासाठी खोके घेतले असतील तर सिद्ध करून दाखवा मी राजकारणातून संन्यास घेईन असेही केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

Advertisement
Tags :

.