For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विद्यमान खासदारांनी १० वर्षात काय केले याचा जाब विचारा - दीपक केसरकर

01:06 PM Apr 26, 2024 IST | अनुजा कुडतरकर
विद्यमान खासदारांनी १० वर्षात काय केले याचा जाब विचारा   दीपक केसरकर
Advertisement

सावंतवाडी |  प्रतिनिधी

Advertisement

ग्रामीण भागातील विकास व्हावा हाच आमचा प्रयत्न आहे.विकास म्हणजे वीज पाणी,रस्ते नव्हे तर युवकांना रोजगार मिळावा,जिल्ह्यात उद्योग व्यवसाय यावेत यासाठी मी व नारायण राणे प्रयत्नशील आहोत.लवकरच आडाळी येथे ५०० कारखाने राणे यांच्यामुळे येणार आहेत.त्यामुळे राणे पुन्हा कॅबिनेट केंद्रीय मंत्री म्हणून दिल्लीत जायला हवेत.यासाठी तुमचं मत नारायण राणे यांना देऊन विजयी करून या विकासाच्या योगदानात सहभागी व्हा असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगेली येथील प्रचार सभेत केले.

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग,शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी,महिला आघाडी प्रमुख निता सावंत कविटकर,तालुकाप्रमुख बबन राणे,निवडणूक प्रभारी प्रमुख गुणाजी गावडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले,गेल्या दहा वर्षात विद्यमान खासदारांनी कोणती विकासकामे केली याचा हिशेब तुम्ही विचारा.मते कोणत्या तोंडाने मागायला येतात हाही प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे.या जिल्हा परिषद मतदार संघात मी कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी दिला.तुम्हीही आमच्यावर प्रेम केले.नारायण राणे यांनीही आपल्या मंत्रिपदाच्या काळात अनेक प्रश्न मार्गी लावले.त्यांच्यामुळे दोडामार्ग तालुक्याची निर्मिती झाली. आणि आपल्या तालुक्यालाही वेगळा निधी मिळू लागला.त्यामुळे त्यांना मतदान करून याची परतपेढ करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.त्याचा फायदा करून घ्या.मोदींच्या विकसित भारत मोहिमेला बळकटी देण्यासाठी राणेंना विजयी करा असे आवाहनही त्यांनी केले.

Advertisement

दीपक केसरकर यांनी उबाठा गटावर हल्लाबोल करताना केवळ दोन दिवस कार्यालयात जाणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद झाली आहे.त्यामुळे त्यांना मते मागण्याचा अधिकार नाही.कोकणी माणसाला अपमानास्पद वागणूक त्यांनी दिलीय.त्याचा वचपा नक्की काढला जाईल.कोकणी माणसाचा हिसका त्यांना नक्की बसेल आणि उद्धव ठाकरे,त्यांचे राजपुत्र,संजय राऊत,विनायक राऊत घरी जातील असा टोला लगावला.

Advertisement
Tags :

.