For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संकट हरले, प्रयत्न जिंकले

06:17 AM Nov 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
संकट हरले  प्रयत्न जिंकले
Advertisement

मृत्यूच्या दाढेतून सुटका होणे म्हणजे काय याचा अनुभव उत्तराखंडातील सिलक्यारा येथील बोगदा दुघर्टनेनंतर सर्वांना आला. संकट हरले प्रयत्न जिंकले, अशी अनुभूती सर्वांना आली आणि मानवी प्रयत्नांचे हे यश देशभर नव्हे अवघ्या विश्वात गाजले. देशभर पायाभूत कामे आणि त्यासाठी रस्ते, बोगदे, पूल यांची उभारणी सुरु असते. उत्तराखंडातील उत्तरकाशी जवळच्या सिलक्यारा येथे बारा नोव्हेंबरला एका बोगद्यात दरड कोसळली आणि त्यामध्ये 41 मजूर अडकले. बोगदा सुमारे शंभर मीटर ढिगाऱ्याने भरलेला अशावेळी आत काय झाले असेल, ढिगाऱ्याखाली या जिवांचे काय झाले असेल हे सांगणेही कठीण. अशावेळी आत मजूर आहेत आणि त्यांचा शोध व मदत केली पाहिजे या हेतूने ही बचाव मोहीम सुरु झाली. एक अविश्वसनीय लढाई सुरु झाली. माणसांचे प्रयत्न आणि मृत्यूचा आ वासलेला जबडा. अखेर माणूस जिंकला. माणसाची जिद्द जिंकली. प्रयत्नांना यश आले आणि सतरा दिवसांनी मृत्यूच्या दाढेत अडकलेले हे 41 मजूर सहीसलामत बाहेर आले. बाहेर आलेल्या सर्वांनी मोकळा श्वास घेतला आणि या अथक, अपूर्व आणि यशस्वी मोहिमेचा गौरव झाला. एक वेगळा इतिहास लिहिला गेला. दरड कोसळली तेव्हा बोगद्याचे तेंड बंद झाले. आतामध्ये 41 मजूर होते. त्यांना बाहेर येण्यास वाटच नव्हती. अवघा हलकल्लोळ माजला. रडारड सुरु झाली. नातेवाईक प्रार्थना, याचना करु लागले. साऱ्या यंत्रणा अलर्ट झाल्या. पण या मजुरांना बाहेर काढणे कठीण झाले होते. मोठे आव्हान होते. राष्ट्रीय आपदा निवारण दलाला पाचारण करण्यात आले. आव्हान जटील आणि नाजूक होते. ढिगाऱ्यातून खाली अडकलेल्या 41 जणांचे प्राण वाचवणे हे ध्येये होते. राज्य आणि केंद्र सरकार आणि जगभराच्या यंत्रणा मदतीला तत्पर होत्या. आणि माणूस निसर्गाच्या या संकटावर मात करण्यासाठी जिद्दीने सरसावला होता. अनंत अडचणी, विविध मते, टिका-टिप्पणी, आरोप पण बचाव पथकांचा निर्धार पक्का होता. त्यांना हवी ती रसद पोहोचत होती आणि मंगळवारी रात्री यश हाताशी आले व माणसांचे प्रयत्न जिंकले. सतरा दिवसांची लढाई यश मिळवून आनंदली. अवघ्या देशभर नव्हे जगभर आनंदाची, समाधानाची लाट आली. पंतप्रधान मोदी या सर्व मोहिमेवर बारकाईने लक्ष ठेऊन होते. सर्व मजूर सुखरुप बाहेर आले आणि त्यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला. सर्व टिमचे अभिनंदन केले. दरड कोसळणे, ढिगाऱ्याखाली माणसे अडकणे असे प्रकार नवीन नाहीत. भूस्खलन दुर्घटनाही पावसाळ्यात समोर येतात. त्यावर मात करण्याचे, बचाव व मदत कार्य करण्याचे प्रयत्न सर्वत्र होतात. उत्तराखंड आणि उत्तरकाशीमध्ये आजवर अनेक आपत्ती व निसर्ग प्रकोप पाहायला मिळाले आहेत. आपल्याकडेही भूस्खलन पिंवा डोंगर कोसळताना अशा घटना समोर आल्या होत्या. पण जिवीतहानी पूर्णपणे रोखता आली असे फारसे झाले नाही. साऱ्या यंत्रणा, मदत व बचावसाठी अग्रेसर असतात पण पाऊस, चिखल, आक्रोश, टिका, राजकारण, दुर्घटना पर्यटन यामुळे अडथळे येतात. निसर्ग प्रतिकूल झाला. पावसाने झोडपले, भूकंप, भूस्खलन अशी आपत्ती आली किंवा महापूर, आग याचा प्रकोप झाला तर कोणाचेच चालत नाही. अलीकडे अनेक यंत्रे, अवजारे यांचे शोध लागले आहेत. त्याचप्रमाणे संपर्क यंत्रणाही विकसित झाल्या आहेत पण ही यंत्रणा दुर्घटना ठिकाणापर्यंत पोहोचवणे आणि दुर्घटनेवर मात करणे यासाठी जबर इच्छाशक्ती लागते. या बोगदा दुर्घटनेत 12 नोव्हेंबरला रविवारी दरड कोसळली. समोर दिवाळी, देशभर उत्सवाचे वातावरण, सुट्टी आणि रजेचे दिवस असताना यंत्रणा हलली आणि घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन कामाला लागली. मजुरांच्या सुटकेसाठी अमेरिकेतून विशेष क्षमतेचे मशिन आणण्यात आले. या ऑगर ड्रिलिंग मशीनच्या सहाय्याने ढिगाऱ्याखालील मजुरांना धक्का न लागता बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले पण हे मशीन बंद पडले. संकटे पाठोपाठ येतात याची अनुभूती आली. जीव वाचवणाऱ्याच्या मोहिमेत चढ-उतार जाणवू लागले. पण जिद्द हरलेली नव्हती. युद्ध प्रथम मनात हरते मग रणांगणावर असे म्हटले जाते पण मन हरले नसले तर विजय खेचून आणता येतो आणि तसेच झाले. मृत्यूच्या दाढेतून शंभर मीटर जमिनीखाली बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 जणांचे प्राण वाचवण्याची मोहीम फत्ते झाली. बचाव व मदत पथकांची शर्थ कामी आली. अनेकांच्या प्रार्थना फळास आल्या. नवा इतिहास लिहिला गेला आणि असेही होऊ शकते हे सर्वांना पाहता आले. अडीच फूट रुंदीच्या पाईपमधून या 41 जणांना बाहेर काढले तो क्षण आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह आणि केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंग यांनी आनंदाने नाचतच त्यांचे केलेले स्वागत आणि या 41 जणांच्या कुटुंबाच्या डोळ्यात जमा झालेले आनंदाश्रू यांना तोड नाही. जेव्हा यंत्र चालेनासे झाले तेव्हा या टिमने मानवी श्रमातून ढिगारा उपसायला सुरुवात केली. आतमधील मजुरांना मनोधैर्य, अन्न, पाणी, श्वास गरजेचा होता. काळ घोंगावत होता. पण नळातून सोडलेल्या स्टेचरवरुन पहिला मजूर बाहेर आला. एका पाठोपाठ एक असे सर्व मजूर सुखरुप बाहेर आले. पुर्नजन्म म्हणजे काय यांचा त्यांनी अनुभव घेतला. आता तो सारा रोमांचकारी इतिहास आहे. त्यावर चित्रपट निघतील अनेक कादंबऱ्या, कथा लिहिल्या जातील आणि मोहीम फत्ते करणाऱ्यांचे पोवाडे गायले जातील. रॅट मायनिंग, रोबोटिक्स, एन्डोस्पोपिक कॅमेरा, ऑर्गर मशिन, रॅट होल्स यासर्व गोष्टींचा अधिक अभ्यास होईल. आपत्ती निवारण दलांना त्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. घडलेली दुर्घटना त्यानंतर उचललेली पावले, केलेला खर्च सांगण्यावर उलटसुलट चर्चा होईल. पण आज जगभर मेसेज गेला आहे. ढिगाऱ्याखाली शंभर मीटर मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या 41 मजुरांना भारताने वाचवले. कठीण, अतिकठीण मोहीम फत्ते करुन दाखवली. देशाचा तिरंगा उंचावला. संकटांना, अडचणींना भारत पाठ दाखवत नाही आणि देशाचे सर्व नागरिक व पंतप्रधानांसह सारे या मोहिमेत अग्रेसर असतात. नरेंद्र मोदी केवळ याच दुर्घटनेत नव्हे तर रेल्वेची धडक असो वा नैसर्गिक प्रकोप ठाण मांडून बसतात. शक्य ते सर्व करुन दाखवतात. भारताची नवी ओळख निर्माण झाली आहे. तिचे स्वागत केले पाहिजे. अशीच जिद्द, प्रयत्न सर्व स्तरावर केले पाहिजेत. या यशस्वी मोहिमेचे आणि त्यामध्ये सहभागी सर्वांचे अभिनंदन. (NDLD), ही तत्त्वे पूर्ण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची साक्ष आहे. सर्वसमावेशकता आमच्या अध्यक्षपदाच्या केंद्रस्थानी राहिली. जी 20 चे कायम सदस्य म्हणून आफ्रिकन संघाच्या (AU) समावेशाने 55 आफ्रिकी देश या मंचाशी जोडले गेले आणि या मंचाचा विस्तार जागतिक लोकसंख्येच्या 80 टक्केपर्यंत केला. या सक्रीय भूमिकेने जागतिक आव्हाने आणि संधींवर अधिक व्यापक संवादाला चालना दिली आहे.

Advertisement

भारताने दोन टप्प्यांमध्ये बोलावलेल्या ‘व्हॉइस ऑफ द ग्लोबल साउथ समिट’ने बहुपक्षीयतेची नवी पहाट उजाडली. अशा प्रकारची परिषद प्रथमच आयोजित केली गेली. ग्लोबल साउथच्या (जगाच्या दक्षिणेकडील विकसनशील देशांच्या) चिंता भारताने आंतरराष्ट्रीय मुख्य प्रवाहात आणल्या आणि विकसनशील देश जागतिक मताला आकार देण्यामध्ये आपले उचित स्थान मिळवू शकतील, अशा युगाची सुरुवात केली. सर्वसमावेशकतेच्या तत्त्वामुळे जी 20 च्या आयोजनात भारताच्या देशांतर्गत दृष्टीकोनाचाही अंतर्भाव होऊन हे अध्यक्षपद जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला साजेसे ‘लोकांचे अध्यक्षपद’ बनले. ‘जन भागीदारी’ (लोकसहभाग) कार्यक्रमांच्या माध्यमातून भारताची जी 20 अध्यक्षता 1.4 अब्ज नागरिकांपर्यंत पोहोचली. यात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश भागीदार म्हणून सहभागी झाले. महत्त्वपूर्ण घटकांवर, आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष हे जी 20 च्या व्यवस्थेशी सुसंगत आणि व्यापक विकासात्मक उद्दिष्टांवर राहील, याची सुनिश्चिती भारताने केली.

2030 अजेंडाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर, शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासंदर्भातल्या प्रगतीला गती देण्यासाठी, आरोग्य, शिक्षण, लैंगिक समानता, पर्यावरणीय शाश्वतता आणि यासह परस्परसंबंधित मुद्यांवर, वास्तवदर्शी, कृतिभिमुखदृष्टिकोनासह भारताने जी 20 -2023 कृती आराखडा मांडला. या प्रगतीला चालना देणारे महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे मजबूत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (DPI). यासंदर्भात आधार, यूपीआय आणि डिजिलॉकर यासारख्या डिजिटल नवकल्पनांचा क्रांतिकारक प्रभाव अनुभवलेल्या भारताने आपल्या शिफारशींमध्ये निर्णायक भूमिका बजावली. जी 20 च्या माध्यमातून आम्ही डिजिटल सार्वजनिक पायाभूत भांडार यशस्वीरीत्या पूर्ण केले. जागतिक तांत्रिक सहकार्यातील ही एक महत्त्वपूर्ण प्रगती आहे. 16 देशांमधील 50 हून अधिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा असलेले हे भांडार ग्लोबल साऊथ देशांना सर्वसमावेशक प्रगतीचे मार्ग खुले करण्यात, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात, अवलंबण्यात आणि त्या अद्ययावत करण्यात साहाय्य करेल.

Advertisement

एक पृथ्वीसाठी तातडीचे, शाश्वत आणि न्याय्य बदल घडवून आणण्यासाठी आम्ही महत्वाकांक्षी आणि समावेशक ध्येय ठेवले आहे. नवी दिल्ली घोषणापत्रातील ‘हरित विकास करार’ उपासमारीचा सामना करणे आणि पृथ्वीचे संरक्षण या पैकी एक पर्याय निवडण्यातील आव्हाने कशी हाताळावी याविषयी आहेत. यात जी सर्वंकष मार्गदर्शक तत्वे समाविष्ट आहेत, त्यात रोजगार आणि पर्यावरण परस्पर पूरक आहे. वस्तूंचा उपभोग, वापर पर्यावरणपूरक आहे आणि उत्पादन, पर्यावरण स्नेही आहेत.  जी 20 नवी दिल्ली घोषणा पत्र या सर्वांशी सुसंगत आहे आणि, यात 2030 पर्यंत जागतिक अक्षय ऊर्जा क्षमता तिप्पट करण्याचे महत्वाकांक्षी ध्येय निश्चित करण्यात आले आहे. या सोबतच जागतिक जैव इंधन सहकार्याची स्थापना तसेच हरित हायड्रोजनला एकत्रित प्रोत्साहन, अधिक स्वच्छ, अधिक हरित जग निर्माण करण्याची जी 20  देशांची  महत्वाकांक्षा कुणीही नाकारू शकत नाही. आणि भारताच्या तत्वज्ञानाचा तर हा कायमच गाभा राहिलेला आहे. शाश्वत विकासपूरक जीवनशैली (Life for Sustainable Development  LiFE), या माध्यमातून आमच्या पुरातन शाश्वत परंपरांचा जगाला लाभ मिळू शकतो.

या घोषणापत्रातून, पर्यावरणीय न्याय आणि समानता, ग्लोबल नॉर्थकडून,  शाश्वत आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य याविषयी आमची कटिबद्धता अधोरेखित होते. यासाठीच्या अर्थसहाय्यात भरघोस वाढ करण्यासाठी, यात अब्जावधी डॉलर्सपासून ट्रीलीयन डॉलर्सपर्यंत जाण्यासाठी मोठी झेप घेण्याची गरज मान्य करण्यात आली. विकसनशील देशांना, 2030 पर्यंत आपली ठरवलेली राष्ट्रीय योगदाने पूर्ण करण्यासाठी 5.9 ट्रीलियन डॉलर्स इतक्या रकमेची गरज असल्याचं, जी 20 संघटनेनेही लक्षात घेतलं आहे.

यासाठी लागणारी प्रचंड संसाधने बघता, जी 20 ने अधिक चांगल्या, मोठ्या आणि अधिक कार्यक्षम बहुआयामी विकास बँकांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सध्या, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सुधारणांमध्ये भारत आघाडीची भूमिका बजावत आहे, यामुळे अधिक न्याय्य जग निर्माण होण्याची अपेक्षा आहे. लिंगभाव समानता या घोषणापत्राच्या केंद्रस्थानी आहे, त्यापार्श्वभूमीवर पुढील वर्षी महिला सक्षमीकरणासाठी एक समर्पित कार्यगट बनविण्यात येणार आहे. भारताचे महिला आरक्षण विधेयक 2023, ज्यात संसद आणि विधीमंडळात महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे, हे विधेयक महिला प्रणीत विकासासाठी आमच्या कटिबद्धतेचे उदाहरण आहे.

महत्त्वाच्या प्राथमिकता विशेषत:  धोरण सुसंगतता, विश्वासार्ह व्यापार आणि महत्त्वाकांक्षी हवामानबदल विषयक कारवाई यासाठी सहकार्य, हा नवी दिल्ली घोषणापत्राचा नवा आत्मा आहे. आपल्या अध्यक्षतेच्या काळात जी 20 परिषदेत 87  निष्पत्ती अहवाल सादर केले आणि 118 दस्तावेज स्वीकारले, ज्यांचे प्रमाण  पूर्वीच्या परिषदांच्या तुलनेत लक्षणीयरित्या अधिक आहे. जी 20 अध्यक्षतेच्या काळात, भारताच्या नेतृत्वात भूराजकीय मुद्दे आणि त्यांचे आर्थिक विकास आणि विकासावर होणारे परिणाम यावर चर्चा घडून आल्या. दहशतवाद आणि निरपराध नागरिकांच्या अविचारी हत्या मान्य नाहीत, आणि आपण शून्य सहनशीलता या धोरणाने त्यांचा सामना केला पाहिजे. शत्रुत्व न ठेवता आपण मानवतेला जवळ केले पाहिजे आणि हा युद्धाचा काळ नाही, याचा पुनरुच्चार केला पाहिजे.

आमच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताने विलक्षण कामगिरी केली याचा मला आनंद आहे. बहुपक्षीयतेचे महत्त्व पुन्हा प्रस्थापित केले, ग्लोबल साउथचा आवाज जगाच्या व्यासपीठावर आणला, विकासाच्या धोरणांचे नेतृत्व केले आणि जगभरात महिला सक्षमीकरणासाठी लढा दिला.   आता आम्ही जी 20 अध्यक्ष पद ब्राझीलला सुपूर्द करत आहोत, असे करताना आम्हाला खात्री आहे की मानवता, पृथ्वी, शांती आणि समृद्धीसाठी आपण उचललेल्या एकत्रित पावलांचे सकारात्मक परिणाम येणाऱ्या काळात जाणवत राहतील.

Advertisement
Tags :

.