For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अवकाळी पावसामुळे गुजरातमध्ये संकट

06:39 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
अवकाळी पावसामुळे गुजरातमध्ये संकट
Advertisement

वीज पडून 20 जणांचा मृत्यू; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Advertisement

वृत्तसंस्था/ गांधीनगर

गेल्या दोन दिवसात गुजरातमधील गांधीनगर, अहमदाबाद, सुरत आणि राजकोटसह बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. या कालावधीत वीज पडून 20 जणांचा मृत्यू झाला. तसेच पावसाशी संबंधित अन्य घटनांमध्ये आणखी चौघांचा मृत्यू झाल्याने या नैसर्गिक आपत्तीतील एकूण बळींचा आकडा 24 झाला आहे. एवढेच नाही तर पिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे.

Advertisement

रविवारी राज्यातील हवामानात अचानक मोठा बदल झाला. भारतीय हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या चोवीस तासात दाहोद जिल्ह्यात तीन आणि भरूच जिह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. याशिवाय अमरेली, सुरेंद्रनगर, मेहसाणा, बोताड, पंचमहाल, खेडा, साबरकांठा, सुरत, तापी आणि अहमदाबाद जिह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, गुजरातच्या 251 तालुक्मयांपैकी 220 तालुक्मयांमध्ये रविवारी सकाळी 6 ते दुपारी 4 दरम्यान 50 मिमी पाऊस झाल्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. तसेच काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे दृश्यमानताही कमी होती. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. गिर सोमनाथ जिल्ह्यातील तलाला येथे सर्वाधिक 50 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय सौराष्ट्रातील जुनागढच्या वंथलीमध्ये 43 मिमी, सुरेंद्रनगरच्या दसडामध्ये 36 मिमी पाऊस झाला. सौराष्ट्र विभागातील मोरबी जिल्ह्यातील कारखाने बंद पडल्याने सिरेमिक उद्योगावरही परिणाम झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महाराष्ट्र, तामिळनाडूतही सतर्कतेचा इशारा

दुसरीकडे, तामिळनाडूच्या कांचीपुरम जिह्यातील काही भागात रविवारीही जोरदार पाऊस झाला. तमिळनाडूच्या काही भागात पाऊस आणि वादळाचा इशारा हवामान खात्याने आधीच दिला होता. पुढील काही तासात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह वादळ येण्याची शक्मयताही आयएमडीने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पालघर, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्मयता आहे.

Advertisement
Tags :

.