साथीदारांच्या मदतीने गुन्हेगाराची दशहत माजवत रिक्षाची मोडतोड
कोल्हापूर :
शहरातील महाराणा चौकात पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि त्याच्या दोघा साथिदारांनी हातात कोयता घेवून, दशहत माजवित रस्त्याच्याकडे उभ्या असलेल्या दोन रिक्षाची मोडतोड केली. तर एका तरुणाच्या घरात शिऊन, त्यांच्या वडीलांना आणि त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला असून, याबाबत लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार शिवराज उर्फ शिवा चंद्रकांत पोवार (रा. घिसाड गल्ली, कोल्हापूर), त्याचा साथिदार आदित्य पोवार (रा. कनाननगर, कोल्हापूर) आणि अन्य एक अनोळखी अशा तिघाविरोधी गुन्हा दाखल झाला आहे. यांची फिर्याद फाऊख बाबासाहेब खान (रा. पठाण बिल्डींग, महाराणा प्रताप चौक, कोल्हापूर) यांनी दिली.
फिर्यादी फाऊख खान यांचा मित्र खंडू माने (रा. वारे वसाहत, कोल्हापूर) याच्याबरोबर रेकॉर्डवरील गुन्हेगार शिवराज उर्फ शिवा पोवार, त्याचा साथिदार आदित्य पोवार आणि एक अनोळखी या तिघाबरोबर किरकोळ कारणावरून पूर्वी वाद झाला होता. यावेळी या तिघांना शिवीगाळ करण्यात आली होती. या शिवीगाळचा राग मनात धऊन, हातात कोयता घेवून हे तिघे फाऊख राहत असलेल्या भाड्याच्या घरात गेले. त्यानी त्यांच्या वडीलासह घरच्यावर दशहत निर्माण करीत, त्यांना शिवीगाळ करुन, ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर या तिघा जणांनी फाऊख खान यांच्या रस्त्याच्याकडेला उभा केलेल्या दोन रिक्षाची कोयताने मोडतोड केली. गुन्हेगार शिवराज उर्फ शिवा पोवार यांच्या विरोधी लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे, यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.