दुष्काळ निधी अपहार प्रकरणी १३ जणांवर फौजदारी! जिल्हा बँकेकडून तासगाव, जत, आटपाडीमध्ये गुन्हे दाखल
सांगली प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखांमध्ये पडून राहिलेल्या दुष्काळ निधीच्या एक कोटी 20 लाख ऊपयांच्या अपहर प्रकरणी 13 आ†धकारी, कर्मच्रायांवर सोमवारी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. तासगाव तालुक्यातील 9, आटपाडी, जत आा†ण पलूस शहर कार्यालयातील कर्मच्रायांचा समावेश आहे. या तेरा कर्मच्रायांना यापूर्वी निलंबित करण्यात आले असून त्यांच्याकडून 90 लाख ऊपयांची वसुली करण्यात आली आहे.
अपहारप्रकरणी दोषी असलेल्या प्रमोद कुंभार, योगेश वजरीनकर, माऊती हिले, संजय पाटील (सर्व तासगाव शाखा)आ†वनाश पाटील अविनाश सूर्यवंशी, सुरेश कोळी (सिद्धेवाडी शाखा) विजय यादव (निमणी शाखा) बाळासो सावंत (पोलीस शाखा) इंग्रजीत वाघमारे (बसरगी शाखा) मच्छिंद्र म्हाऊगडे प्रदीप पवार, दिगंबर शिंदे (सर्व नेलकरंजी शाखा) यांचा समावेश आहे. तपास अधिकारी हबीब कुलकर्णी यांनी संबधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
जिल्हा बँकेतील शेतकर्यांच्या खात्यावर शासनाकडून विविध प्रकारचे अनुदान, विमा रक्कम देण्यात येते. यातील अनेक खात्यांवरील रक्कम काढली जात नाही. अनेक असलेल्या वर्षांपासून कोट्यावधी ऊपयांची रक्कम तशीच पडून आहे. या रकमेचा अपहार करून ती काढल्याचा प्रकार तासगाव मार्केट यार्ड शाखेत पुढे आला. त्यानंतर सिद्धेवाडी येथेही असे प्रकार झाल्याचे निष्पˆ झाले. त्याशिवाय निमणी, हातनूर येथील शाखेतही असे प्रकार आढळल्यानंतर संबधित कर्मचार्यांना तत्काळ निलंबित केले. तपासणीमध्ये एक कोटी वीस लाख ऊपयांचा आभार निश्चित झाला असून त्यापैकी 90 लाख ऊपयांची वसुली करण्यात आली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेत काही कर्मचारी संचालकाच्या जवळचे आहेत. अपहाराचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर ते दडपण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी आ†धकारी शिवाजीराव वाघ यांनी या संबंधित संचालकाचा दबाव जुगारत कठोर कारवाई करण्याची भुमिका घेतली. त्यानुसार अगोदर निलंबन करून आता फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दाखल केला. जिल्हा बँकेतर्फे चांगले काम करणार्यांना प्रोत्साहन तर चुकीचे काम करणार्यांवर कारवाई केली जाते. बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एकावेळी सर्वाधिक 13 कर्मचार्यांवर कारवाई केली आहे,