महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नेत्यांनी ‘बाहुबलीं’ना जवळ केल्यानेच गुन्हेगारीत वाढ

12:19 PM Jan 07, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर :  

Advertisement

राजकारणामध्ये आता नेत्यांना कार्यकर्त्यांऐवजी ‘बाहुबली’ जवळ असावे असे वाटू लागले आहेत. यातून सामान्य कार्यकर्त्यांचे महत्व कमी झाले. तर गुंठा मंत्री पुढे आले, गुन्हेगिरीकरण वाढले. सध्या समाज माध्यमाची ताकद मोठी आहे. त्यामुळे सर्व सामान्य माणंसांनी समाजमाध्यमांवर व्यक्त होऊन अशा राजकारणांवर अंकुश ठेवण्याची वेळ आली असल्याचे स्पष्टोक्ती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केली. सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आल्या असता त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

Advertisement

गोऱ्हे म्हणाल्या, शेतकरी, कष्टकरी, ज्येष्ठ नागरिकासह लाडक्या बहिण्यांच्यासाठी आणलेल्या योजनांमुळे विधानसभेच्या निवडणूकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले. सत्तास्थापन झाल्यानंतर पहिल्याच हिवाळी अधिवेशनामध्ये महत्वाची विधयेक मंजूर झाली आहेत. कारागृह सुधारणा करणे, महसुल संदर्भात गहाण जमिनीबाबत सुधारणा यांचा समावेश आहे.

सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, कोल्हापूरमध्ये पर्यावरण, अंधश्रद्धा निर्मुलनसह अन्य मागण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून काही नागरिक लढा देत आहेत, अशा मुठभर लोकांच्या चळवळींच्या दखल सरकाराला घ्यावी लागते. या चळवळीच्या दबावामुळेच माणंसामधील जुलमी वृत्तीला वेसन घालणे शक्य झाले आहे. समाज माध्यमही प्रचंड सामार्थ्यवान झाली आहेत. परंतू याचाही काही वेळेस चुकीच्या व्यवस्थेवरही परिणाम होतो. यातून दलाल, सौदेबाजांचा दबाव होणार नाही, याची दक्षता घेणे गरजचे आहे. वर्ण भेद, वंश भेद, स्त्राr-पुरूष भेदाच्या दबावाखाली काम करावे लागत आहे. अशा वातावरणात स्वत:मध्ये बदल करावा लागेल, राजकारणातून पैस आणि पैशातून राजकारण हे समीकरण योग्य नाही.

बदलापूर प्रकरण झाल्यानंतर रात्रीच तेथे गेलो. संबधितांच्या घरामध्ये जावून माहिती घेतली. पोलिस स्टेशनलाही गेलो. यानंतर एन्काऊंटरमध्ये आरोपी मयत झाला. एन्काऊंटरची घटना चुकीचीच आहे. परंतू ज्यांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली त्यानीच नंतर आरोपीच्या एन्काऊंटवर प्रश्न उपस्थित करणे हे कितपत योग्य आहे, असाही सवाल डॉ. गोऱ्हे यांनी उपस्थित केला.

                                    मुंबईतील दादागिरी मोडून काढली पाहिजे

मुंबईतील मराठी भाषिकांवर होणाऱ्या हल्याबाबत विचारले असता डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, मुंबईत परप्रांतिय मंजूरांची वाढ होत आहे. यातूनच असे प्रकार वाढत आहे. अशा लोकांची दादागिरी मोडून काढली पाहिजे. प्रत्येक भाषिक नेत्यांनी हा प्रकार होऊ नये यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पोलिसांनीही परप्रांतियांवर वचक ठेवली पाहिजे.

                                      एचएमपीव्हीबाबत भिती पसरू नये

एचएमपीव्ही साथीच्या आजाराबाबत विनाकारण भिंती पसरू नये. या आजाराने मृत्यू झाल्याची नोंद जगात कुठेच आढळलेली नाही. यावर दक्षता घेणे हा उपाय आहे. तसेच फसवणूकीचे प्रकार होऊ नयेत याचीही काळजी घेतली पाहिजे.

                                     वाल्मिक कराड पवारांच्याही संपर्कात

बीड प्रकरणाबाबत विचारले असता डॉ गोऱ्हे म्हणाल्या, वाल्मिक कराड हे केवळ सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांच्या संपर्कात होते असे नाही. ते राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांच्याही संपर्कात होते. या प्रकरणात जे कायदेशीर कारवाई करावी लागते ती मुख्यमंत्री फडणवीस करतील.

                                     मार्चमध्ये मनपा निवडणूक शक्य

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक मार्चला होतील. पालकमंत्र्यांचा तिढाही लवकरच सुटेल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. पत्रकारांच्या पेन्शन आणि निवासस्थानाबाबत मुख्यमंत्री, उपमूख्यमंत्र्याकडे पाठपुरावा केला जाईल. 15 वर्ष पत्रकारिता करणाऱ्यांची यादी मिळाल्यास त्यांना पेन्शन लागू करणे शक्य होईल.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article