कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Sangli News : सांगलीत जप्त फ्लॅटचा ताबा घेणाऱ्या दोघांवर गुन्हा

04:01 PM Nov 28, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                            सांगली पोलिसांनी जप्त फ्लॅटवर बेकायदा ताब्याविरुद्ध गुन्हा नोंद

Advertisement

सांगली : कर्जाच्या थकबाकीपोटी जप्त केलेल्या फ्लॅटचा बेकायदा ताबा घेतल्याप्रकरणी कर्जदार अभिजीत बापूसाहेब पाटील व पत्नी निकिता अभिजीत पाटील (रा. वानलेसवाडी) यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

याबाबत युनियन बैंक ऑफइंडियाचे मुख्य व्यवस्थापक संजयकुमार गुप्ता यांनी फिर्याद दिली आहे. कर्जदार अभिजीत व निकिता पाटील या दाम्पत्याने १५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत निसर्ग व्हीला अपार्टमेंटमधील थकबाकीपोटी बँकेने जप्त केलेल्या सीलबंद फ्लॅटचे सील तोडून बेकायदा ताबा घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Advertisement
Tags :
#abhijitpatil#IllegalPossession#LoanDefaulters#NikitaPatil#PropertyBreach#sangli#SealedFlat#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia#UnionBankOfIndiaSangli illegal possession case
Next Article